Video Viral : 'लुडो गेम' घ्या.... तरुणानं उमेदवाराला सूचवलेलं हटके चिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 01:37 PM2019-10-07T13:37:38+5:302019-10-07T13:39:12+5:30
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आलं आहे. या चिन्ह वाटपावेळी उमेदवारांची चांगलीच धांदल उडल्याचं पाहिला मिळालं. नवख्या किंवा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना नेमकं कोणत्या चिन्हाला पसंती द्यावी, हेच कळना. त्यावेळी, काही सहकाऱ्यांनी मदतीने उमेदवारांनी चिन्ह निश्चिती केली. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या निवृत्त शिक्षकाचीही अशीच धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं.
भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यांना, राष्ट्रवादीकडून राहुल मोटे यांचं आव्हान आहे. मात्र, या मतदारसंघातून एका शाळेतील निवृत्त शिक्षकानेही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, निवडणुकांसाठी चिन्ह निश्चित करताना या शिक्षकाची धांदल उडाली. त्यामुळे काय चिन्हा घ्यावं हेच सूचना झालतं? त्यावेळी तहसिल कार्यालयात हजर असलेल्या एका युवकाने त्या शिक्षकाल लुडो गेम घ्या लई फेमसंय, असे म्हणत लुडो गेमचं चिन्ह सूचवलं होतं. त्यावेळी, शिक्षक उमेदवारही विचारत पडले होते. मात्र, अखेर सहकारी मित्राच्या सांगण्यावरुन त्यांनी गॅस शेगडी हे चिन्ह निश्चित केलं आहे. मात्र, सोशल मीडियावर, लुडो गेम घ्या... असं म्हटल्याचा व्हिडीओ परिसरात व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ -