VIDEO : सौताडा धबधबा वीस वर्षानंतर धो- धो!

By admin | Published: September 24, 2016 02:13 PM2016-09-24T14:13:28+5:302016-09-24T14:16:42+5:30

शुक्रवारी व शनिवारी झालेल्या धुवाधार पावसामुळे पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर धबधबा धो-धो वाहू लागला.

VIDEO: Washing waterfall after twenty years wash-wash! | VIDEO : सौताडा धबधबा वीस वर्षानंतर धो- धो!

VIDEO : सौताडा धबधबा वीस वर्षानंतर धो- धो!

Next
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २४ -  सतत चार वर्षांचा दुष्काळ व पर्जन्यमानातील घट यामुळे पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर धबधबा ओसंडून वाहिला नव्हता; परंतु शुक्रवारी व शनिवारी झालेल्या धुवाधार पावसाने या धबधब्यावरुन धो- धो पाणी कोसळू लागले आहे.
 
चार वर्षांआधी हा धबधबा वाहिला होता;पण धारेची गती कमी होती. वीस वर्षानंतर हा धबधबा एवढ्या वेगाने कोसळू लागल्याचे गावक-यांचा दावा आहे. सौताडा येथे खोल दरीत श्री. रामेश्वराचे मंदिर आहे. शंभर फुटापेक्षा जास्त उंच धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकाना भुरळ घालत आहे.  या धबधब्यावरील तलाव ओव्हरफ्लो झाला असून दोन धारांमधून पाणी कोसळत आहे. धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनही सौताड्याची ओळख आहे. बीड व अहमनदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात धबधब्याचे निसर्गरम्य व विहंगम चित्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

Web Title: VIDEO: Washing waterfall after twenty years wash-wash!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.