VIDEO : लोकसहभागातून रुजतेय जलसंधारणाची चळवळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2017 08:33 PM2017-03-08T20:33:05+5:302017-03-08T20:33:05+5:30
संदीप वानखडे /ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 8 - गेल्या काही वर्षात विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. तसेच ...
संदीप वानखडे /ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 8 - गेल्या काही वर्षात विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. तसेच पिकांनाही पाणी मिळाले नाही. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीटंचाईचे संकट उभे आहे. पाणीटंचाईवर कायमची उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली.पावसाच्या पाण्याचे संचयन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, या उदात्त हेतून अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यात वॉटर कप राबवण्यात येत आहे. कपमध्ये सहभागी होण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ रुजत आहे.
अकोला, दि. 8 - गेल्या काही वर्षात विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागले. तसेच पिकांनाही पाणी मिळाले नाही. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीटंचाईचे संकट उभे आहे. पाणीटंचाईवर कायमची उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली.पावसाच्या पाण्याचे संचयन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, या उदात्त हेतून अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यात वॉटर कप राबवण्यात येत आहे. कपमध्ये सहभागी होण्यासाठी लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ रुजत आहे.
प्रत्येक गावात पाणलोट व्वस्थापनाच्या वैज्ञानिक पद्धती वापरून पावसाचे पाणी साठवले पाहिजे, या हेतूने सत्यमेव जयते वॉटर कपचे आयोजन पाणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. हा कप म्हणजे स्पर्धेच्या काळात जलसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ््या गावांमध्ये लावलेली शर्यत होय. पाणी फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील लोकांना अमरावती जिल्ह्यतील पोरगव्हाण येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण घेऊन आलेल्या लोकांनी आपआपल्या गावांमध्ये मोहिमेचे काम सुरू सुद्धा केले आहे. प्रशिक्षित व्यक्ती पावसाचे पाणी साठवण्यासाठी काय आवश्यक आहे, त्यासाठी काय करण्याची गरज आहे, हे पटवून देत आहेत. या मोहिमेच्या दुसऱ्या सत्राचा कालावधी ८ एप्रिल २०१७ ते २३ मे २०१७ असा आहे.
१८० गावांनी घेतला सहभाग
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील १८० गावांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील ७०, पातूर तालुक्यातील ६१ आणि अकोट तालुक्यातील ४९ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत बार्शीटाकळी तालुक्यातील २२ गावे, पातूर तालुक्यातील १६ गावे आणि अकोट तालुक्यातील ३४ गावे प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.
२४९ लोकांनी घेतले प्रशिक्षण
वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील लोकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था पाणी फाउंडेशनच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पोरगव्हाण येथे करण्यात आली आहे. या प्रशिक्षणादरम्यान, ग्रामस्थांना श्रमदानाचे महत्त्व, पावसाच्या पाण्याचे संचयन कसे करावे, शिवार फेरी आदींसह विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहेत. या प्रशिक्षणात आतापर्यंत २४९ लोकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातून १०४, पातूर तालुक्यातून ७२ आणि अकोट तालुक्यातून ७३ लोकांनी प्रशिक्षण घेतले आहे.
एक कोटीचे बक्षिसे
एक कोटीचे बक्षिसे
सत्यमेंव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना पाणी फाउंडेशनच्यावतीने रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातून प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० लाख, द्वितीय ३० लाख आणि तृतीय २० लाखांचा पुरस्कार मिळणार आहे. तसेच तालुका स्तरावरही पुरस्कार मिळणार आहेत. तालुक्यात जलसंधारणाची उत्तम कामगिरी करणाऱ्या गावाला १० लाख रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.
असे मिळतील गावांना गुण
सत्यमेंव जयते वॉटर कप ही स्पर्धा ४५ दिवस चालणार असून, १०० गुणांची राहणार आहे. यामध्ये नांदेड पॅटर्न शोष खड्डे ५ गुण, वृक्षरोपण खड्डे ५ गुण, श्रमदान/मनुष्यबळाचा वापर करून बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण रचना ५ गुण, एरिया ट्रीटमेंट आणि रिज माथा उपचारांवर योग्य भर १० गुण, रचनांची गुणवत्ता १० गुण, मूलस्थानी मृदा उपचार १० गुण, पाणी बचत तंत्रज्ञान ५ गुण, वॉटर बजेट ५ गुण, विहीर आणि बोअरवेल पुनर्भरण ५ गुण, अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचानांची दुरुस्ती, नावीण्यपूर्ण उपक्रम ५ गुणांचा समावेश आहे.
प्रशिक्षित लोकांनी सुरू केली कामे
प्रशिक्षण घेऊन आलेल्या लोकांनी आपापल्या गावात कामे सुरू केली आहेत. घर तेथे शोष खड्डे, गावात प्रभात फेरी, शिवार फेरी, चावडीवर दुष्काळाशी दोन हातवर चित्रपट दाखवणे, ग्रामस्थ या कामांसाठी स्वत: लोकवर्गणी करीत आहेत. गाव बैठका, विद्यार्थ्यांसाठी पाणी या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन, पाणी विषयाची मशाल फेरी काढण्यात येणार आहे. स्पर्धेत गावांना बार्शीटाकळी तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ, समाधान वानखडे, पातूरचे प्रफुल कोल्हे, सुभाष नानवटे, अकोट तालुक्यासाठी नरेंद्र काकड आणि मनीष महल्ले आदी मार्गदर्शन करीत आहेत.
https://www.dailymotion.com/video/x844vdr