VIDEO - टेमघरनंतर आता वडिवळे धरणातून पाणीगळती

By admin | Published: September 9, 2016 10:06 PM2016-09-09T22:06:11+5:302016-09-09T22:13:41+5:30

टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे.

VIDEO - Waterfall now from the Wadivale dam | VIDEO - टेमघरनंतर आता वडिवळे धरणातून पाणीगळती

VIDEO - टेमघरनंतर आता वडिवळे धरणातून पाणीगळती

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
वडगाव मावळ, दि. ९ -  टेमघर धरणानंतर आता मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून पाणीगळती वाढली आहे. जलसंपदा विभागाने अनेक वर्षापासून दुरुस्ती व डागडुजी न केल्याने धरणाच्या भिंतीतून कारंजा सारखे पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळे धरण परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मात्र, कार्यकारी अभियंत्यांनी धरण सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. 
मावळ तालुक्यातील नाणो मावळात सुमारे 1.44 टीएमसी क्षमतेचे वडिवळे धरण आहे. या धरणाची निर्मिती 1978 मध्ये करण्यात आली. धरणाची पाणीसाठा क्षमता 40.87 दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा 30.39 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचा कालवा व नदीपात्रद्वारे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकासाठी सुमारे सहा हजार हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे परिसरातील गावे सुजलाम् सुफलाम् झाली आहेत. परंतु, गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या दरवाजातून पाणी गळती होत असल्यामुळे रोज लाखो लिटर पाणी कालव्याद्वारे वाया जात आहे. 
गेल्या अनेक वर्षापासून धरणाची डागडुजी न केल्यामुळे पाणी विसर्गाच्या दरवाजाच्या भागात सिमेंट निखळले असून, खडी वाहून गेली आहे. त्यामुळे भिंतीला छेद पडून त्यातून मोठय़ा प्रमाणात गळती वाढली आहे. संपूर्ण भिंतीवर पाणी गळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या धरण 100 टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरणाच्या पाया, भिंतीतून काही अंतरातून असलेली गळती ही कारंज्याप्रमाणो स्पष्ट दिसते. धरणाची गळती तातडीने न थांबविल्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भिती स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
स्थानिकांमध्ये असुरक्षितता.  
वडिवळे गावाजवळील कुंडलिका नदीवर बांधलेल्या वडिवळे धरणाला 38 वर्षे झाली आहेत. देहू, आळंदी या तीर्थक्षेत्रंना या धरणातून पाणीपुरवठा होतो.  मात्र, धरणाची वेळोवेळी दुरुस्ती व देखभाल करण्यात आलेली नाही. त्यामुळे धरण्याच्या भिंतीची दुरवस्था झाली आहे. सांडव्यातून पाणी सोडले जाते, त्या ठिकाणी भिंतीचे सिमेंट निघून गेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गळती सुरू झाली आहे. धरण परिसरात गोवित्री, करंजगाव, साबळेवाडी,कांबरे, कोडीवडे, नाणो, कोलवाडी, वालवंती, उदेवाडी , नवीन उकसान ही गावे आहेत. या गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, धरणाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 
 
‘‘धरणाच्या पाणीविसर्गाच्या ठिकाणी सिमेंट निघून गेल्यामुळे थोडय़ा प्रमाणात पाण्याचा पाझर येत आहे. यामुळे धरणाच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.  मे-जून महिन्यांत धरणाची देखभाल दुरुस्ती केल्यामुळे पाण्याचा पाझर कमी झाला आहे. आता पुढील मे-जूनमध्ये पुन्हा देखभाल-दुरुस्तीचे काम केल्यास होणारा पाझर पूर्णपणो बंद होईल. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आता पाझर चालू आहे. परंतु पाणी कमी झाल्यास देखभाल करून आम्ही तो पूर्ण नियंत्रणात आणू. धरण पूर्णपणो सुरक्षित आहे.’’
- रवी जाधव, अभियंता, वडिवळे धरण.

Web Title: VIDEO - Waterfall now from the Wadivale dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.