VIDEO: जेव्हा हिंदू मुलगा गणपतीच्या प्रसादासाठी मुस्लिमांकडे पैसे मागतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2016 11:06 AM2016-09-09T11:06:02+5:302016-09-09T13:12:38+5:30

आपल्या आईने गणपतीचा प्रसाद आणण्यासाठी दिलेले पैसे हरवले आहेत असं सांगत हा 8 वर्षाचा मुलगा मुस्लिमांकडे पैशांची मदत मागत आहे

VIDEO: When a Hindu boy asks for money for the festival of Ganpati | VIDEO: जेव्हा हिंदू मुलगा गणपतीच्या प्रसादासाठी मुस्लिमांकडे पैसे मागतो

VIDEO: जेव्हा हिंदू मुलगा गणपतीच्या प्रसादासाठी मुस्लिमांकडे पैसे मागतो

googlenewsNext
- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - गणेशोत्सव सण सुरु करण्यामागे लोकमान्य टिळकांचा असलेला मुख्य उद्देश म्हणजे सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र यावं. पण आज इतक्या वर्षांनी जेव्हा गणेशोत्सवाचं पारंपारिक रुप बदललं आहे तेव्हा उद्धेशदेखील बदलला आहे का ? प्रत्येक धर्माने आपला देव निवडला आहे अशावेळी दुस-या धर्माला मदत करण्याची वेळ येते तेव्हा नेमकं काय होतं ? नेमकं याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी प्रयोग म्हणून फंक यू या ग्रपुने युट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये एक हिंदू मुलगा गणेशोत्सवासाठी मुस्लिमांकडे पैसे मागताना दिसत आहे. 
 
आपल्या आईने गणपतीचा प्रसाद आणण्यासाठी दिलेले पैसे हरवले आहेत असं सांगत हा 8 वर्षाचा मुलगा मुस्लिमांकडे पैशांची मदत मागत आहे. अनेकांना या मुलाला कोणीच मदत करणार नाही, याउलट त्याला धर्माचे उपदेश देतील आणि पाठवतील असं वाटलं असेल पण तसं काहीच होत नाही. मुलाने पैसे मागितल्यानंतर त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या नक्कीच पाहण्यासारख्या आहेत. या व्हिडीओमुळे माणुसकी धर्मातच असते हे पुन्हा एकदा दिसून येतं.
 

प्रत्येक धर्माने आपल्या निवडी ठरवल्या आहेत. अगदी जेवणाच्या पद्धतीपासून ते देवापर्यंत प्रत्येकाने आपली निवड ठरवली आहे, आणि त्याच साच्यात ते जगत असतात. हिंदू आणि मुस्लिम म्हटलं तर जणू काही ते एकमेकांचे पारंपारिक शत्रु असल्यासारखच पाहिलं जातं. पण कदाचित हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या प्रत्येकाचं मत बदलेल. हा व्हिडीओ आत्तापर्यंत तब्बल 9 लाख लोकांनी पाहिला आहे.
 

Web Title: VIDEO: When a Hindu boy asks for money for the festival of Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.