VIDEO- ...जेव्हा महसूलमंत्री कोळी गीत गातात !

By Admin | Published: May 9, 2017 09:58 PM2017-05-09T21:58:46+5:302017-05-09T21:58:46+5:30

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. 9 - कोल्हापूर थिएटर संस्थेच्या नाट्य आणि चित्रपट अभिनय शिबिराला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ...

VIDEO- ... when revenue minister sang songs! | VIDEO- ...जेव्हा महसूलमंत्री कोळी गीत गातात !

VIDEO- ...जेव्हा महसूलमंत्री कोळी गीत गातात !

Next

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 9 - कोल्हापूर थिएटर संस्थेच्या नाट्य आणि चित्रपट अभिनय शिबिराला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अचानक आज भेट दिली आणि बालकलाकारांसोबत एकच धम्माल केली. चंद्रकांत दादांच्या कोळी गीतावर बालचमूंनी ठेका तर धरलाच पण वन्समोरही मागितला.

बुधवार दि. 3 मे रोजी कोल्हापुरात कोल्हापूर थिएटर संस्थेच्या नाट्य व चित्रपट अभिनय शिबिराला सुरुवात झाली, या शिबिराचे उद्धाटनही महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झालं होतं. ज्या परिसरात हे शिबिर सुरू आहे, त्याच परिसरातून महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील एका कार्यक्रमानिमित्तानं जात होते, आज त्यांच्या लक्षात येताच त्यांनी अचानक आपला ताफा या शिबिराकडे वळविला आणि मुलांबरोबर एक तास धम्माल उडवली.

या वेळी त्यांनी त्याच्या काळातील शिबिरांची आठवण काढत जुन्या गोष्टींना उजाळा दिला. तसेच त्यांनी या मुलांसाठी टिमक्याची चोळी बाई हे कोळी गीत ही सादर केले, या गीताला बालचमूंनी वन्स मोरने भरभरून प्रतिसाद दिला. त्याच बरोबर चंद्रकांतदादांनी ही त्यातील लहान मुलांच्या एका समूहाच्या मुक्त अभिनयास रोख रक्कम देऊन त्यांचे कौतुकही केले. गेल्या 3 मेपासून सुरू असणा-या शिबिरामध्ये आजपर्यंत अभिनेते स्वप्नील राजशेखर, संजय हळदीकर, भरत दैनी, दीपक बिडकर, प्रदीप शिवगण यांनी मार्गदर्शन केले आहे. या प्रसंगी शिल्पा माजगावकर, विजय टिपुगडे, संजय मोहिते, अॅड. दिलशाद मुजावर, संजय मुंगळे, राजश्री खटावकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

https://www.dailymotion.com/video/x844ytr

Web Title: VIDEO- ... when revenue minister sang songs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.