VIDEO : नाशिकच्या नांदूरमधमेश्वरमध्ये विदेशी पक्ष्यांचे ‘हिवाळी संमेलन’ सुरू

By admin | Published: November 3, 2016 12:06 PM2016-11-03T12:06:04+5:302016-11-03T13:59:30+5:30

राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलाशयावर देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या हिवाळी संमेलनाला सुरूवात झाली

VIDEO: The 'Winter Session' of foreign birds in Nanduramashmesh, Nashik | VIDEO : नाशिकच्या नांदूरमधमेश्वरमध्ये विदेशी पक्ष्यांचे ‘हिवाळी संमेलन’ सुरू

VIDEO : नाशिकच्या नांदूरमधमेश्वरमध्ये विदेशी पक्ष्यांचे ‘हिवाळी संमेलन’ सुरू

Next
हजारोंच्या संख्येने विदेशी स्थलांतरित पक्षी जलाशयावर दाखल
 
 
अझहर शेख, आॅनलाइन लोकमत
नाशिक, दि. ३ -   राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलाशयावर देशी-विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांच्या हिवाळी संमेलनाला सुरूवात झाली आहे. शेकडोंच्या संख्येने देशी-विदेशी विविध प्रकारांचे बदक जलाशयावर विहार करताना पहावयास मिळत आहे. नांदूरमधमेश्वरची राणी म्हणून ओळखली जाणारी जांभळी पानकोंबडी जणू यजमानाच्या भूमिकेत पाहूण्या पक्ष्यांचे स्वागत आपल्या वैशिष्टपूर्ण आवाजाने ‘टायफा’ गवतामधून करत आहे.
 
विजयादशमीचा सण साजरा होताच विविध जातीच्या पक्ष्यांनी सीमोल्लंघन करत नांदूरमधमेश्वरचे जलाशय गाठले. दिवाळी साजरी करण्यासाठी सध्या जलाशयावर पक्ष्यांचा जणू मेळा भरला आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक थंडीचा तालुका म्हणून निफाड ओळखला जातो. यावर्षी जिल्ह्यासह निफाडमध्ये जोरदार पाऊस झाल्याने थंडीचे आगमनही लवकर झाले आहे. निफाडच्या हद्दीत पोहचताच बोचºया थंडीचा अनुभव सकाळी येतो. 
 
चालू आठवड्यापासूनच नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडू लागल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी दाखल होणार  असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सद्यस्थितीत सुमारे वीस प्रकारचे पक्षी नांदूरमधमेश्वर अभयारण्यात मुक्तपणे विहार करताना दिसून येत आहेत. यामध्ये काही विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. एकूणच नांदूरमधमेश्वर अभयारण्याकडे पक्षी येण्याचे प्रमाण वाढू लागल्याने परिसर पक्ष्यांच्या आवाजाने गजबजू लागला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनाही मोह आवरता येत नसून ‘वीकेण्ड प्लॅन’साठी येथील पक्षी अभयारण्याला हौशी व अभ्यासू पक्षीप्रेमींकडून पसंती दिली जात आहे.
 
आॅक्टोबर अखेरच्या आठवड्यापासून पक्ष्यांची संख्या अभयारण्यामध्ये वाढू लागल्याचे या भागातील युवा पक्षी निरीक्षक अमोल दराडे, शंकर लोखंडे यांनी सांगितले. सध्या गोदाकाठ पंचक्रोशीत गुलाबी थंडी जाणवू लागली आहे; मात्र चालू महिन्याअखेर थंडीचा प्रभाव अधिक वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे थवे अभयारण्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
 
 
 
या पक्ष्यांचे सध्या वास्तव्य
 
कॉमन क्रेन, आशियाई करकोचा, कोंबडक, शॉवलर, गढवाल, कॉमन कुट (वारकरी-चांदवा) पेंटेंड स्टॉर्क, राखी बगळा, जांभळा बगळा, मार्श हेरियर, व्हाईट आयबीज्, शिकरा, ग्रीन बिटर, स्पूनबिल, जांभळी पानकोंबडी, जांभळा करकोचा या पक्ष्यांचे सध्या पक्षी अभयारण्याच्या जलाशयावर वास्तव्य आहे. सुमारे वीस ते पंचवीस प्रकारचे पक्षी जलाशयावर मुक्तपणे विहार करत आहे.
 
 
सोयीसुविधांमुळे समाधान
 
गेल्या वर्षी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये सोयीसुविधांची प्रचंड वानवा होती. यामुळे या ठिकाणी येणाºया पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. नाशिक वनविभागाने (वन्यजीव) पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी व अभयारण्याच्या विकासासाठी विविध विकासकामे पुर्ण केली आहे. चापडगाव, मांजरगाव, खानगावथडी येथून अभयारण्यामधील पक्षी मनोºयांकडे जाणाºया वाटेवर स्वागतकमानी उभारण्यात आल्या आहेत. याबरोबरच चापडगावला पक्षी अभयारण्यालगत वनविभागाने उद्यान उभारले असून येथे इको हट, इको कॅन्टिन, प्रसाधनगृहे, तंबू निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. याचप्रमाणे येथील अभयारण्यामधील पक्षी निरिक्षण मनोºयांची दुरूस्ती करण्यात आली आहे. पक्षी निरिक्षण गॅलरीचाही मजला वाढविण्यात आला असून मजबुतीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी सुसज्ज वाहनतळ व प्रतीक्षागृहही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.                        

Web Title: VIDEO: The 'Winter Session' of foreign birds in Nanduramashmesh, Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.