VIDEO : तरुणींचा कुस्तीकडे वाढलाय कल
By Admin | Published: January 10, 2017 03:48 PM2017-01-10T15:48:40+5:302017-01-10T16:11:11+5:30
आळंदीच्या तालमीत तरूणी करताहेत 'दंगल'चा सराव ऑनलाइन लोकमत पिंपरी -चिंचवड, दि. १० - राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ...
आळंदीच्या तालमीत तरूणी करताहेत 'दंगल'चा सराव
ऑनलाइन लोकमत
पिंपरी -चिंचवड, दि. १० - राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात विशेष कामगिरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन पिंपरी, चिंचवड, भोसरी व आळंदी परिसरातील मुलींनी स्वत:ला खेळात झोकून दिले आहे. कुस्ती, कबड्डी, हॉकी, नेमबाजी, अॅथलेटिक्स अशा विविध खेळ प्रकारांत मैदान गाजविणारया महिला खेळाडूंचा आदर्श घेऊन तरुणींचा खेळाकडे कल वाढला आहे. आळंदीच्या तालमीत कुस्तीच्या सरावासाठी येणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे. पाच वर्षापुर्वी तालमीत सराव करणाऱ्या अवघ्या तीन मुलींची संख्या सध्या ४५ च्या घरात गेली आहे.
आॅलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत पदक जिंकणाऱ्या अनिसा सय्यद,अंजली भागवत, राही सरनोबत यांच्यासह आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली तळेगावची हर्षदा जाधव, आंतरराष्ट्रीय धावपटू भाग्यश्री बिले यांचा आदर्श बाळगून मुलींचा खेळाकडे ओढा वाढला आहे. कबड्डीत बाजी मारलेल्या दीप्ती जोसेफ, तसेच आशियाई स्पर्धेत कुस्तीत सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली वडमुखवाडीची अंकिता गुंड अशा खेळाडूंमुळे पुणे जिल्ह्यातील तरुणींना खेळाबद्दलचे आकर्षण निर्माण झाले आहे. कुस्तीसारख्या मर्दानी खेळात महिलाही कमी नाहीत, हे हरियाणातील गीता फोगट आणि बबिताकुमारी या भगिनींनी पटकाविलेल्या पदकांनी सिद्ध केले. त्यावर दंगल चित्रपट आला आहे. त्यामुळे तरुणींचा कल कुस्ती खेळसाकडे वाढला आहे. आता पालकही मुलींना खेळाबद्दल प्रोत्साहन देऊ लागले आहेत. असा सकारात्मक बदल घडून येत असल्याचा अनुभव आळंदीतील तालमीत मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देणाऱ्या दिनेश गुंड यांनी व्यक्त केला.
https://www.dailymotion.com/video/x844nss