संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:54 IST2025-03-04T14:51:27+5:302025-03-04T14:54:23+5:30
Santosh Deshmukh Viral Videos Photos: संतोष देशमुखांना प्रचंड यातना देऊन संपवण्यात आले. ज्यावेळी मारहाण सुरू होती, त्यावेळी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर कॉल करण्यात आला होता. फोटो आणि व्हिडीओही टाकण्यात आले होते.

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय?
Santosh Deshmukh Video and Photos: ९ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या शिवारात सापडला. या तीन तासांत संतोष देशमुख यांना नरकयातना दिल्या गेल्या. आरोपींनी कशा पद्धतीने संतोष देशमुखांना हालहाल करुन मारले याचे फोटोच समोर आले आणि महाराष्ट्राचं मन हळहळले! संतोष देशमुखांना संपवत असताना आरोपींनी ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर कॉल केले आणि व्हिडीओ पोस्ट केले. त्याचं नावही समोर आलंय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीच्या पथकाने १५०० पानांचे आरोपपत्र केजच्या न्यायालयात सादर केले. तपासात सीआयडीला काय काय सापडले, याबद्दल दररोज नवी माहिती समोर येत आहे. सोमवारी (३ मार्च) संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने संपवण्यात आले, याचे फोटो आरोपपत्रातील फोटो पुढे आले.
त्या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव काय?
संतोष देशमुखांना मारहाण केल्याचे जे व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत, ते एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात आले. या व्हॉट्सअॅप ग्रुपचे नाव मोक्कारपंथी असे आहे. कृष्णा आंधळे याने आधी संतोष देशमुखांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यानंतर याच मोक्कारपंथी ग्रुपवर एक व्हिडीओ कॉलही करण्यात आला होता.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना केलेल्या व्हिडीओ कॉलवर वाल्मीक कराड होता. त्याने हे बघितले आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपरून केलेला कॉल आणि फोटो आणि व्हिडीओ सीआयडीने पुरावा म्हणून जप्त केले आहेत.
'सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे म्हण'
सीआयडीने जप्त केलेल्या चौथ्या व्हिडीओमध्ये 'सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असे म्हण', असे आरोपी संतोष देशमुखांना म्हणायला लावत आहेत.
पाचव्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, संतोष देशमुखांना फक्त उघडे करून बसवण्यात आले आणि त्यांच्या पाठीवर पाईपने अमानुषपणे मारहाण करण्यात आली.