Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 12:21 PM2022-06-08T12:21:43+5:302022-06-08T13:50:30+5:30

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Vidhan Parishad Election 2022: BJP announces list for Vidhan Parishad candidate; Pankaja Munde again not given chance | Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली 5 उमेदवारांची यादी; पंकजा मुंडेंचा पुन्हा पत्ता कट

googlenewsNext

मुंबई: सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची धुम सुरू आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणूक होत आहे. त्यानंतर 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होईल. यासाठी भाजपने आपल्या 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 

पंकजा मुंडेंना पुन्हा हुलकावणी
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. पण, गेल्या काही निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात आले. यंदाही त्यांच्या नावीची जोरदार चर्चा होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे आहे.

'पंकजांसाठी पक्षाने वेगळा विचार केला असेल'
आज भाजपने यादी जाहीर केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उमेदवारांची नावे सांगितले. त्यांना यावेळी पंकजा मुंडेंबाबत विचारण्यात आले, त्यावर ते म्हणाले की, 'विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे निर्णय केंद्र सरकार घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा सर्वांनी शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो. आमच्या पक्षात आम्ही कोरी पाकीटे असतो, पक्षश्रेष्ठी उमेदवारीबद्दल ठरवत असतात. पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पण, कदाचित पक्षाने त्यांच्यासाठी भविष्यातला दुसरा विचार केला असेल,' असे ते म्हणाले.

'भाजपची नाराजी क्षणभर असते'

जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे, अपेक्षा व्यक्त करणे आणि इच्छित गोष्ट न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात काहीही गैर नाही. पण, भारतीय जनता पक्षातील नाराजी म्हणजे पाण्यातील जहाज क्रेनने उचलल्यावर पडणारा खड्डा असतो, तो एका क्षणात पाण्याने भरला जातो, तशी आहे. भाजपमधील नाराजी त्या पाण्यातल्या खड्ड्याप्रमाणे आहे, ती क्षणभर असते. कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी इच्छा व्यक्त करणे, अपेक्षा व्यक्त करणे, चुकीचं नाही. पंकजा मुंडे सध्या भाजपच्या राष्ट्रीच सरचिटणीस आहेत, मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्यांच्यासाठी पक्षाने आणखी काही विचार केला असेल, असेही ते म्हणाले.


 

Read in English

Web Title: Vidhan Parishad Election 2022: BJP announces list for Vidhan Parishad candidate; Pankaja Munde again not given chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.