"सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी...", अमोल मिटकरींचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 05:24 PM2022-06-13T17:24:55+5:302022-06-13T17:25:57+5:30
Vidhan Parishad Election: राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Vidhan Parishad Election: राज्यसभेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला दणका देत तिसऱ्या जागेवर विजय मिळवला. अपक्ष आणि छोट्या मित्रपक्षांची मते फुटल्याने भाजपाला यश मिळेल. राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपने पक्षाचे 5 तर अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना उभे केले होते. पण, सदाभाऊंनी ऐनवेळी अर्ज मागे घेतला. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टोला लगावला आहे.
सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 13, 2022
भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, "म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल."@Sadabhau_khot
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता 20 जुन रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यात सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांना भाजपनेही पाठिंबा दर्शवला होता. पण, सदाभाऊंनी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यावर अमोल मिटकरी म्हणाले की, "सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय, मात्र आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही. भाऊ त्या फडणिसांना सांगा, म्हणावं, म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय. आणखी दोन पावलं माग येऊन सन्या गुमान बसल," असे ट्वीट मिटकरी यांनी केले आहे.
कुणाचा अर्ज मागे
आज ऐनवेळी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला. तर, राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या दोन्ही उमेदवारांच्या अर्ज माघारीमुळे आता विधानरपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे निवडणूक रिंगणात असणार आहेत.