विधानपरिषद तिकीटवाटपात देवेंद्र फडणवीसांचा शब्द चालला, दिल्लीश्वरांनी 'दुसरा पर्याय' निवडला!

By यदू जोशी | Published: May 8, 2020 06:32 PM2020-05-08T18:32:29+5:302020-05-08T18:46:42+5:30

माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कोणालाही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Vidhan Parishad Election: BJP leaders show trust in Devendra Fadnavis by selecting names for MLC | विधानपरिषद तिकीटवाटपात देवेंद्र फडणवीसांचा शब्द चालला, दिल्लीश्वरांनी 'दुसरा पर्याय' निवडला!

विधानपरिषद तिकीटवाटपात देवेंद्र फडणवीसांचा शब्द चालला, दिल्लीश्वरांनी 'दुसरा पर्याय' निवडला!

googlenewsNext
ठळक मुद्देविधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने चार उमेदवारांची घोषणा केली आहे.एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कोणालाही संधी देण्यात आली नाही.फडणवीस यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी मिळाल्यानं त्यांचा शब्द चालला असे म्हटले जाते.

>> यदु जोशी

मुंबई - विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कोणालाही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. खडसे हे फडणवीस यांचे विरोधक मानले जातात तसेच पंकजा मुंडे यांनीही अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्यावर मध्यंतरी टीका केली होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना तावडे हे कधीही त्यांचे निकटवर्ती नव्हते. मात्र बावनकुळे हे फडणवीसांचे जवळचे मानले जातात. या चौघांना संधी द्यावी की विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळत पडळकर, मोहिते पाटील यांना संधी देऊन अन्य दोन जागांसाठी पक्षातील नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असे पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय पक्षाने निवडला.

Legislative Council elections: BJP

प्रस्थापित नेत्यांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने मात्र खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे यांच्यापैकी किमान दोघांना तरी संधी द्यावी असा आग्रह केंद्रीय नेतृत्वाकडे धरला होता. मात्र पक्षनेतृत्वाने तो अमान्य केला अशी माहिती सूत्रांनी दिली. फडणवीस विरोधकांना न मिळालेली उमेदवारी आणि जाहीर झालेल्या नावांमध्ये फडणवीस यांच्या निकटवर्तीयांचा असलेला समावेश यामुळे उमेदवारी वाटपात फडणवीसांचा शब्द चालला असे म्हटले जाते. बावनकुळे यांच्याबाबत वरून नकार असल्याने फडणवीस यांनी दटके यांचे नाव सुचवले अशीही माहिती आहे. दटके हे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व फडणवीस या दोघांचेही निकटवर्ती आहेत.

मोहिते पाटील मराठा समाजाचे, पडळकर धनगर समाजाचे, दटके बारी समाजाचे तर गोपछेडे हे लिंगायत समाजाचे आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोहिते-पाटील आणि पडळकर हे भाजपमध्ये गेले होते. तसेच प्रवीण दटके हे फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. गोपछेडे यांचे नाव संघ भाजप वर्तुळातून पुढे आले आहे. आजची यादी बघता त्यावर देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा दिसतो.

पडळकर हे सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे लढले होते आणि त्यांनी दोन लाखावर मते घेतली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि बारामतीत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना आव्हान दिले पण पडळकर यांचा दारुण पराभव झाला होता. 

धनगर समाजात प्रभावी असे नेतृत्व आज भाजपकडे नाही. आक्रमक नेते अशी पडळकर यांची ओळख आहे. माजी मंत्री महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत आणि त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपसोबत आहे, पण पक्षात एक धनगर नेतृत्व पुढे यावे या दृष्टीने पडळकर यांना संधी दिली असल्याचे म्हटले जाते.

रणजितसिंह मोहिते हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत. मोहिते घराण्याचा सोलापूर व माढा या दोन लोकसभा मतदारसंघातील राजकारणावर प्रभाव आहे. प्रवीण दटके यांची कौटुंबिक पार्श्वभूमी संघ, भाजपचीच आहे. त्यांचे वडील प्रभाकरराव दटके हे नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष होते. विधान परिषदेसाठी पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या नावाची देखील चर्चा होती पण त्यांच्या नशिबी पुन्हा एकदा प्रतीक्षाच आली आहे.

संबंधित बातम्या

मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकणाऱ्यांना संधी?, विधानपरिषदेवरुन नाथाभाऊंची नाराजी

विधानपरिषद निवडणूक: खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळेंना भाजपाचा धक्का, राजकीय पुनर्वसन नाहीच!

विधान परिषद निवडणूक : भाजपला चौथी जागा का द्यायची; काँग्रेसने धरला दोन जागांचा आग्रह

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंची नावं निश्चित

देवेंद्र फडणवीसांना ट्रोल करण्यासाठी टोळी किंवा खासगी कंपनीला कंत्राट; तक्रार दाखल

 

Web Title: Vidhan Parishad Election: BJP leaders show trust in Devendra Fadnavis by selecting names for MLC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.