Vidhan Parishad Election Result: अकोल्यामध्ये भाजपाचा शिवसेनेला दे धक्का, गोपिकिशन बाजोरियांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 10:05 AM2021-12-14T10:05:41+5:302021-12-14T10:06:20+5:30

Vidhan Parishad Election Result: अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद मतदारसंघामध्येही BJPने Shiv Senaना आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आहे. येथे भाजपाचे Vasant Khandelwal यांनी शिवसेनेचे मातब्बर नेते Gopikishan Bajoria यांना पराभूत केले आहे. 

Vidhan Parishad Election Result: BJP pushes Shiv Sena in Akola, Vasant Khandelwal defeats Gopikishan Bajoria | Vidhan Parishad Election Result: अकोल्यामध्ये भाजपाचा शिवसेनेला दे धक्का, गोपिकिशन बाजोरियांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय 

Vidhan Parishad Election Result: अकोल्यामध्ये भाजपाचा शिवसेनेला दे धक्का, गोपिकिशन बाजोरियांचा पराभव करत वसंत खंडेलवाल यांचा दणदणीत विजय 

googlenewsNext

अकोला - आज लागलेल्या विधान परिषदेच्या दोन जागांच्या निकालांमध्ये भाजपाने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. नागपूरपाठोपाठ अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद मतदारसंघामध्येही भाजपानेशिवसेना आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला आहे. येथे भाजपाचे वसंत खंडेलवाल यांनी शिवसेनेचे मातब्बर नेते गोपिकिशन बाजोरिया यांना पराभूत केले आहे. 

अकोला-वाशिम-बुलडाणा विधान परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व होते. मात्र महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतरही त्यांचे येथील वर्चस्व मोडीत काढण्यात भाजपाला यश मिळाले आहे. एकूण ८०८ मते असलेल्या या मतदारसंघामध्ये भाजपाचे वसंत खंडालवार यांना ४३८ मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३३० मतांवर समाधान मानावे लागले. येथेही महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडल्याचे दिसून आले. 

दरम्यान, राज्यातील संपूर्ण राजकी वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. येथील भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला. एकूण ५५४ मतदार असलेल्या या मतदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांना एक मत मिळाले. येथे काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलून मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्याचा काँग्रेसला फायदा मिळाला नाही. 

Web Title: Vidhan Parishad Election Result: BJP pushes Shiv Sena in Akola, Vasant Khandelwal defeats Gopikishan Bajoria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.