Vidhan Parishad Election Result: बावनकुळेंचा विजय भाजपच्या पुढील विजयाची नांदी, महाविकास आघाडीला चपराक- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 11:59 AM2021-12-14T11:59:08+5:302021-12-14T12:04:28+5:30

Vidhan Parishad Election Result: नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विजयी; काँग्रेस उमेदवार पराभूत

Vidhan Parishad Election Result chandrashekhar bawankule s victory slap for mahavikas aghadi says devendra fadanvis | Vidhan Parishad Election Result: बावनकुळेंचा विजय भाजपच्या पुढील विजयाची नांदी, महाविकास आघाडीला चपराक- फडणवीस

Vidhan Parishad Election Result: बावनकुळेंचा विजय भाजपच्या पुढील विजयाची नांदी, महाविकास आघाडीला चपराक- फडणवीस

googlenewsNext

नागपूर: राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजपानं बाजी मारली आहे. भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला. एकूण ५५४ मतदार असलेल्या या मतदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली, तर काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. 

बावनकुळेंच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला. मी स्वत: विजयी झालो, तेव्हा जितका आनंद मला झाला होता, त्यापेक्षाही जास्त आनंद मला आज झाला आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीसाठी चपराक असल्याचं फडणवीस म्हणाले. 

तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपचा विजय झाला. राज्यातील जनता भाजपच्या पाठिशी असल्याचं यातून दिसतं. चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय महाविकास आघाडीसाठी चपराक असून भाजपसाठी पुढील विजयाची नांदी आहे, असं फडणवीसांनी म्हटलं. या विजयानंतर बावनकुळे भावुक झाले. त्यांनी फडणवीसांना मिठी मारली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं नसतानाही चंद्रशेखर बावनकुळेंनी सबुरीनं, संयमानं काम केलं. मनावर दगड ठेऊन बावनकुळे दोन वर्षे काम करत राहिले.  त्याचा फायदा त्यांना झाला, असं पाटील म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडीनं गुप्त मतदान पद्धतीनं घेऊन दाखवावी. मग अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होतो आणि सरकारच्या पाठिशी किती आमदार आहेत ते सरकारला कळेल, असं थेट आव्हान त्यांनी दिलं.
 

Web Title: Vidhan Parishad Election Result chandrashekhar bawankule s victory slap for mahavikas aghadi says devendra fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.