विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 15:22 IST2024-06-18T15:22:08+5:302024-06-18T15:22:48+5:30
Vidhan Parishad Election - राज्यात विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर जागांसाठी येत्या २७ जूनला मतदान होणार आहे. त्यानंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. ११ सदस्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या २७ जुलैला संपत आहे त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
कोण सदस्य निवृत्त होणार?
डॉ. मनीषा कायंदे
विजय गिरकर
अब्दुल्ला खान दुर्रानी
निलय नाईक
अनिल परब
रमेश पाटील
रामराव पाटील
डॉ.वजहत मिर्झा
प्रज्ञा सातव
महादेव जानकर
जयंत पाटील
या ११ जणांचा विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ २७ जुलैला संपत आहे. तत्पूर्वी या जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. १२ जुलैला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
नोटिफिकेशन - २५ जून २०२४, मंगळवार
अर्ज भरण्याची शेवटची तारीख - २ जुलै २०२४ मंगळवार
उमेदवारांच्या अर्जाची छाननी - ३ जुलै २०२४, बुधवार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - ५ जुलै २०२४, शुक्रवार
मतदान - १२ जुलै २०२४, वेळ - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत
मतमोजणी - १२ जुलै २०२४, शुक्रवार - संध्याकाळी ५ वाजता
विधान परिषदेच्या ७८ जागांपैकी ३० सदस्य विधानसभा आमदारांकडून मतदानाने निवडले जातात. त्यांच्यापैकी निलय नाईक, रामराव पाटील, रमेश पाटील, विजय गिरकर हे भाजपाचे सदस्य आहेत. तर मनीषा कायंदे शिवसेना शिंदे गट, अनिल परब शिवसेना ठाकरे गट, बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी काँग्रेस, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव हे काँग्रेसचे आणि जयंत पाटील शेकाप, महादेव जानकर रासप हे ११ सदस्य १० जुलै २०१८ रोजी बिनविरोध निवडून आले होते. त्यांची मुदत २७ जुलैला संपत आहे. तर अद्यापही विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त आहे. मविआ सरकारच्या काळात १२ जणांची यादी राज्यपालांकडे सोपवली होती परंतु त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली नाही.