विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 06:00 PM2017-12-07T18:00:58+5:302017-12-07T18:05:24+5:30
मुंबई- विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. प्रसाद लाड यांनी 209 मतांसह आमदारकी मिळवली आहे. तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं पडली आहेत.
मुंबई- विधान परिषद निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. प्रसाद लाड यांनी 209 मतांसह आमदारकी मिळवली आहे. तर आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं पडली आहेत. विधान परिषद निवडणुकीत दोन मतं बाद ठरवण्यात आली आहेत. तर विरोधकांची 9 मतं फुटली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी (27 नोव्हेंबर)रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे शिवसेनेनंही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच प्रसाद लाड यांना विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी (27 नोव्हेंबर)रात्री महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत प्रसाद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे शिवसेनेनंही भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला होता.
नारायण राणेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी आज पोटनिवडणूक झाली. नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक झाली. विधानसभेतील सदस्यांनी या निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. त्यानंतर आज युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.
कोण आहेत प्रसाद लाड ?
छगन भुजबळांचे खंदे समर्थक असणा-या व राष्ट्रवादीची सत्ता जाताच प्रसाद लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 2014ची विधानसभा निवडणूक त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीकडून लढविली आणि ते भाजपाकडून पराभूत झाले होते. त्यानंतर काही महिन्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्या वेळी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला; पण ते केवळ दोन मतांनी पराभूत झाले. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठीची ती निवडणूक होती. त्यात शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने लाड हे मुख्यमंत्र्यांच्या गोटात गेले आणि चांगलेच स्थिरावले. आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट विधान परिषदेवर निवडून आणलं. मुख्यमंत्र्यांचे नागपुरातील कट्टर समर्थक परिणय फुके यांना भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून पाठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अशीच प्रतिष्ठा पणाला लावली आणि फुके विजयी झाले होते. तथापि फुकेंची गणना मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांपेक्षा मित्रांमध्ये होते. प्रवीण दरेकर, आर. एन. सिंह यांना विधान परिषदेवर पाठविताना मुंबई महापालिकेचे राजकारण डोळ्यांसमोर होते. मात्र, आज लाड यांना मिळालेली उमेदवारी ही मुख्यमंत्री समर्थकांना भविष्यात मिळणार असलेल्या संधीची सुरुवात मानली जात आहे.