Vidhan Sabha 2019 : शिवेंद्रसिंहराजेंना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीची तिरकी चाल !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 04:54 PM2019-09-20T16:54:20+5:302019-09-20T16:54:52+5:30

मुख्यमंत्र्यांनी देखील सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजेंची उमेदवारी फिक्स असल्याचे संकेत दिले. त्यामुळे दीपक पवार नाराज असून त्यांनी राष्ट्रवादीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

Vidhan Sabha 2019 : NCP move to push Shivinder Singh In satara | Vidhan Sabha 2019 : शिवेंद्रसिंहराजेंना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीची तिरकी चाल !

Vidhan Sabha 2019 : शिवेंद्रसिंहराजेंना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीची तिरकी चाल !

Next

मुंबई - आतापर्यंत इनकमिंगमुळे हुरळून गेलेल्या भारतीय जनता पक्षाला 'ऑउटगोइंग'चा धक्का बसणार आहे. साताऱ्यातील भाजप नेते आणि जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, भाजपला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार आहे. राष्ट्रवादीकडून देखील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना शह देण्यासाठी दीपक पवारांना पक्षात प्रवेश देण्यात येणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसपासून शिवेंद्रसिंहराजे भोसले दुरावत होते. अखेर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाच. त्यांच्यापाठोपाठ उदयनराजे यांनी देखील खासदारकीचा राजीनामा देत भाजप गाठले. त्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. त्याचवेळी दिग्गजांच्या इनकमिंगमुळे भाजप ओव्हरफूल झाले. याचीच परिणीती म्हणून 2014 मध्ये शिवेंद्रराजेसिंह यांच्याविरुद्ध लढलेले दीपक पवार राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.

2014 मध्ये दीपक पवार यांनी कमी वेळी प्रभावी मते मिळवली होती. त्यानंतर त्यांनी मागील चार वर्षांत आणखी कसून तयारी केली. परंतु, ऐनवेळी शिवेंद्रराजे भाजपमध्ये दाखल झाल्याने त्यांची अडचण झाली. तर मुख्यमंत्र्यांनी देखील सातारा विधानसभा मतदार संघातून शिवेंद्रराजेंची उमेदवारी फिक्स असल्याचे संकेत दिले. त्यामुळे दीपक पवार नाराज असून त्यांनी राष्ट्रवादीत सामील होण्याचा निर्णय़ घेतला आहे.

दरम्यान आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून आपल्यासोबत 388 बुथप्रमुख आणि तालुक व शहरप्रमुख राष्ट्रवादीत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीला देखील बळकटी मिळणार आहे. तर साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी ही तिरकी चाल चालू शकते, असा अंदाज आहे.   

 

 

Web Title: Vidhan Sabha 2019 : NCP move to push Shivinder Singh In satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.