Vidhan sabha 2019 : विनोद तावडे, बावनकुळे ‘वेटिंग’वरच! खडसेंऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:50 AM2019-10-03T06:50:57+5:302019-10-03T06:51:13+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी रात्री १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.

Vidhan sabha 2019: Vinod Tawde, Bawankule on 'Waiting'! | Vidhan sabha 2019 : विनोद तावडे, बावनकुळे ‘वेटिंग’वरच! खडसेंऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी?

Vidhan sabha 2019 : विनोद तावडे, बावनकुळे ‘वेटिंग’वरच! खडसेंऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी?

Next

- यदु जोशी

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी रात्री १४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. मात्र, या यादीतही उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी महसूलमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावांचा समावेश नाही. तावडे व बावनकुळे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील असल्याचे समजते. खडसे यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना खडसे वादग्रस्त ठरले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. खडसेंना विधानसभेची उमेदवारी नक्कीच मिळेल, असे मानले जात असताना बुधवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीतही विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खडसे यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असा निरोप दिल्लीवरून आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील एकदोन जिल्ह्यांच्या राजकारणाचा विचार करता खडसे यांना जातीय आधारावर उमेदवारी देण्याची गरज आहे, असे समर्थन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले; पण त्यावर श्रेष्ठींनी अनुकूलता दर्शविली नाही. पर्याय म्हणून खडसेंच्या कन्या रोहिणी यांचा विचार करा असा निरोप वरून त्यांना आला. या बाबतचा नेमका निर्णय अद्याप व्हायचा आहे.

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम असून त्यांना तिकीट मिळावे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रयत्नशील असल्याचे समजते.

रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. त्यांना उमेदवारी दिल्याने समाजाचीही नाराजी कमी होईल आणि खडसेंच्याच घरात उमेदवारी कायम राहील, असे समर्थन केले जात आहे.

निर्णय दिल्लीत अडला
तावडे यांचे बोरीवली मतदारसंघाचे तिकीट दिल्लीतच अडले आहे. तावडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. खडसे वा तावडे यांना उमेदवारी देणे हे प्रदेश भाजपच्या हातात असते तर निर्णय लवकर झाला असता; पण निर्णय दिल्लीत अडला असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले. तावडे, बावनकुळे, खडसे या तिघांबाबत भाजपश्रेष्ठी धक्कातंत्र अवलंबणार, अशी चर्चा आहे.

गणेश नाईकांना उमेदवारी
बेलापूर मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या गणेश नाईकांना ऐरोलीमधून उमेदवारी दिली गेली आहे. या मतदारसंघातून भाजपने गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांना उमेदवारी दिली होती. पण आता तिथे स्वत: गणेश नाईक लढणार आहेत. भाजपने त्यांना ए-बी फॉर्म दिला.

Web Title: Vidhan sabha 2019: Vinod Tawde, Bawankule on 'Waiting'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.