Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 01:57 PM2024-11-19T13:57:01+5:302024-11-19T13:59:15+5:30

१९६२ पासून अनेकांनी पक्ष स्थापन करून निवडणुकीत उमेदवार केले असले तरी त्यांना मिळालेले यश जेमतेमच राहिले आहे.

Vidhan Sabha election: How many parties are in the fray for each Vidhan Sabha in Maharashtra? | Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

मुंबई : १९६२ ते २०२४ च्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात पक्षांची संख्या वाढून ती आता १५८ वर पोहोचली आहे. १९६२ च्या निवडणुकीत केवळ १० पक्ष रिंगणात होते, तर त्यातील ६ पक्षांना आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळाले होते. २०१९ मध्ये तब्बल १२४ पक्षांनी निवडणूक लढविली. त्यातील केवळ १५ पक्षांना आमदार निवडून आणण्यात यश मिळाले.

पक्ष तर काढले, यश किती? 

१९६२ पासून अनेकांनी पक्ष स्थापन करून निवडणुकीत उमेदवार केले असले तरी त्यांना मिळालेले यश जेमतेमच राहिले आहे. १९८५ पर्यंत पक्ष कमी होते आणि त्यांचे उमेदवारही निवडून येत होते. 

मात्र, १९९० नंतर पक्ष संख्या वाढल्यानंतर पक्षांचे उमेदवार निवडून येण्याचे प्रमाण  कमी होत गेले. २०१४ मध्ये, तर ९० पक्षांनी निवडणुकीत उमेदवार उभे केले, त्यातील केवळ १२ पक्षांना आपला उमेदवार जिंकून आणता आले. या पक्षांमुळे मत विभागणीला चालना मिळाली आहे.

Web Title: Vidhan Sabha election: How many parties are in the fray for each Vidhan Sabha in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.