आणखी किती जणांचे बळी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:00 AM2017-07-27T03:00:34+5:302017-07-27T03:00:36+5:30

घाटकोपर येथील सिद्धिसाई इमारत दुर्घटनेवरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला

Vidhansabha, ghatkopar building collapse | आणखी किती जणांचे बळी घेणार?

आणखी किती जणांचे बळी घेणार?

Next

मुंबई : घाटकोपर येथील सिद्धिसाई इमारत दुर्घटनेवरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपासह काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या सदस्यांनी शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत १७ जणांचे बळी गेल्यामुळे या विषयावर स्थगन प्रस्ताव स्वीकारून चर्चा घडवून आणावी, अशी मागणी विरोधकांनी केली; मात्र प्रश्नोत्तराचा त्रास रद्द करण्यास अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नकार दिल्यामुळे तीनवेळा कामकाज तहकूब झाले. शेवटी प्रश्नोत्तराचा तास गोंधळात संपल्यानंतर या विषयावरील चर्चा सुरू झाली.
सभागृहात शिवसेनेचे सदस्य शांत बसून होते. मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, रामदास कदम, एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील हे विधानसभा तहकूब झाल्यानंतर एकत्र येऊन बराच वेळ बोलत थांबले होते.
या दुर्घटनेला जबाबदार असणाºया दोषींवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. ते म्हणाले, या दुर्घटनेला मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. ज्या इमारतीबाबत ही दुर्घटना घडली त्या इमारतीचे महापालिकेने स्ट्रक्चर आॅडिट केले होते का? सदर इमारतीमधील तळमजल्याच्या नूतनीकरणासाठी महापालिकेने परवानगी दिली होती का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
सदर इमारतीच्या तळमजल्यात शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या सुनील शितप याने अनधिकृतपणे नूतनीकरण सुरू केले होते. हे नूतनीकरण करताना इमारतीचा मुख्य पिलर तोडण्यात आला, त्याबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रारही केली होती. परंतु शितप याने या रहिवाशांना धमकावून गप्प केले. शिवसेनेचा पदाधिकारी असल्यामुळे महापालिकेनेही त्याला अभय दिले होते. मुंबई महापालिकेने शिवसेनेच्या पदाधिकाºयाच्या उचापतींकडे दुर्लक्ष केल्यानेच ही घटना घडली असून, या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृतांच्या कुटुंबीयांना सरकारने तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी या वेळी पवार यांनी केली.

एकही अधिकारी निलंबित नाही - आव्हाड
भेंडी बाजारात १० मजली इमारत पूर्णपणे बेकायदा उभी राहते, तरीही त्याकडे कोणी लक्ष देत नाही. आजपर्यंत यासाठी एकही अधिकारी निलंबित झाला नाही. सुनील शितपसारखे लोक प्रत्येक पक्षात आहेत, हा तर पक्का भूमाफिया आहे, असे सांगून राष्टÑवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अधिकाºयांना पाठीशी घालणाºयांवर कठोर टीका केली. घाटकोपर भागात रुड लॉन्ज नावाचे हॉटेल आहे, चायना ग्रील, बिकानेर स्वीट ही बेकायदेशीर हॉटेल राजरोस चालू आहेत. कर्णिक नावाचा पालिकेतला विधी खात्याचा अधिकारी या सगळ्यांना पाठीशी घालतो, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.

पहारेकरी झोपी गेले का? - विखे यांची टीका
मुंबई महापालिकेत आम्ही पहारेकºयाच्या भूमिकेत आहोत असे सांगणारी भाजपा कुठे गेली? हे पहारेकरी झोपी गेले का? नाले सफाईत अधिकारी आणि भाजपा सेनेचे नगरसेवक हात साफ करून घेत आहेत, या सगळ्या भ्रष्ट व्यवस्थेत जर आपलेच सहकारी असतील तर त्यांच्यावर कारवाई कशी काय होणार, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. मुंबई महापालिकेची आता प्रा. लि. कंपनी झाली आहे, अशी टीका करून विखे पाटील म्हणाले, ज्या ज्या अधिकाºयांनी या सगळ्या प्रकरणात परवानग्या दिल्या त्या सगळ्यांची यात चौकशी करा, एमएमआरडीए रिजनमधील मनपा अधिकाºयांच्या बदल्या करण्याचा कायदा करा, नाहीतर हे अधिकारी सगळ्या विभागाचे वाटोळे करतील.

Web Title: Vidhansabha, ghatkopar building collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.