शिवसेना-भाजपात सवतासुभ्याचे दर्शन

By admin | Published: May 4, 2015 02:11 AM2015-05-04T02:11:49+5:302015-05-04T02:11:49+5:30

राज्यातील सत्तेत असलेल्या भाजपा व शिवसेनेतील सवतासुभ्याचे दर्शन रविवारी दिसले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी परस्परांच्या कार्यक्रमांना दांडी मारून युतीमध्ये आलबेल नसल्याची ग्वाही दिली.

View of Sarasukhubha at Shivsena-BJP | शिवसेना-भाजपात सवतासुभ्याचे दर्शन

शिवसेना-भाजपात सवतासुभ्याचे दर्शन

Next

मुंबई : राज्यातील सत्तेत असलेल्या भाजपा व शिवसेनेतील सवतासुभ्याचे दर्शन रविवारी दिसले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी परस्परांच्या कार्यक्रमांना दांडी मारून युतीमध्ये आलबेल नसल्याची ग्वाही दिली.
शिवसेना-भाजपा युतीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दादर येथे त्यांच्या नावे साकारण्यात आलेल्या कला केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव उपस्थितांच्या यादीत होते. मात्र उद्धव हे तिकडे फिरकले नाहीत.
उद्धव यांनी यावेळी राजकारणातील घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांना चिमटा घेतला. ठाकरे म्हणाले की, दीपक सावंत, त्यांच्या पत्नी अनिला आणि पुत्र स्वप्नेश हे तिघे डॉक्टर आहेत. राजकारणात असे झाले तर त्यालाच घराणेशाही म्हणतात. या रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे ते येऊ शकले नव्हते. पायाभरणी समारंभ व उद्घाटन आपल्याच हस्ते होत आहे, असेही ठाकरे म्हणाले. स्वप्नेश हे परदेशात शिकून भारतात आले हे कौतुकास्पद असून डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारख्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्यांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

Web Title: View of Sarasukhubha at Shivsena-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.