राज्यात लम्पीबाबत दक्षतेचा इशारा, 30 जिल्ह्यात शिरकाव; पशुसंवर्धनमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 06:40 PM2022-09-25T18:40:24+5:302022-09-25T18:43:46+5:30

Lumpy Skin : पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन विखे-पाटील यांनी केले आहे.

Vigilance warning about Lumpy in the state, 30 districts hit; Information from Minister of Animal Husbandry | राज्यात लम्पीबाबत दक्षतेचा इशारा, 30 जिल्ह्यात शिरकाव; पशुसंवर्धनमंत्र्यांची माहिती

राज्यात लम्पीबाबत दक्षतेचा इशारा, 30 जिल्ह्यात शिरकाव; पशुसंवर्धनमंत्र्यांची माहिती

Next

नांदेड : लम्पी त्वचारोगाचा दुग्ध उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याने राज्यातील पशुपालकामध्ये घबराट निर्माण झाली आहे. राज्यात लम्पीने थैमान मांडले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. तर राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. विखे पाटील हे आज नांदेड दौऱ्यावर होते, यावेळी मिनी सह्याद्री अतिथी गृहाच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला असून मी प्रत्यक्ष फिरुन आढावाही घेत आहे. राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन विखे-पाटील यांनी केले आहे.

ज्या जनावरांना लम्पी आजार झाला आहे, अशा जनावराना बाजूला ठेवून त्यावर औषधोपचार तात्काळ सुरु केले पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना, पशुपालकांना लम्पी आजार लसीकरण दृष्टीकोनातून काही कमी पडू दिले जाणार नाही, असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. तसेच, सध्या ज्या गावात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत. त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघापर्यत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. 5 किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हणाले.

शासनाकडून अर्थसहाय्य 
लम्पी त्वचारोगामुळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत, त्यांच्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी 30 हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी 25 हजार रुपये, लहान कारवडी असल्यास 16 हजार रुपये मदत दिली जात आहे. या व्यतीरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

राज्यात वेगाने पसरतोय लम्पी
लम्पी हा जनावरांना होणारा संसर्गजन्य आजार संपूर्ण राज्यात वेगाने पसरत असून अवघ्या दहा दिवसांतच या रोगाने हातपाय सर्वच जिल्ह्यांत वेगाने पसरले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील 2019 मध्ये केलेल्या पशुगनने नुसार महाराष्ट्रात 33 लाख पशुधन असून त्यापैकी गोवंशीय पशुधनाची संख्या 13.9 लाख, म्हैस वर्गाची 5.6 लाख, मेंढ्यांची 2.7 लाख आणि शेळ्यांची संख्या 10.6 लाख आहे. हे पशुधन राज्याच्या 63 हजार खेड्यापाड्यांत आहे. 

Web Title: Vigilance warning about Lumpy in the state, 30 districts hit; Information from Minister of Animal Husbandry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.