विजय कुवळेकर यांना लोमटे स्मृती पुरस्कार
By Admin | Published: September 21, 2014 02:21 AM2014-09-21T02:21:15+5:302014-09-21T02:21:15+5:30
यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीतर्फे दिला जाणारा दुसरा भगवानराव लोमटे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार लोकमतचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला.
अंबाजोगाई (जि़ बीड) : यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीतर्फे दिला जाणारा दुसरा भगवानराव लोमटे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार लोकमतचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांना शुक्रवारी प्रदान करण्यात आला. रोख 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आह़े
व्यासपिठावर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विद्यासागर पंडीत, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रा. रं. बोराडे, स्मृती समारोह समितीचे अध्यक्ष गिरीधारीलाल भराडिया, सचिव दगडू लोमटे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना कुवळेकर म्हणाले की, सर्वच क्षेत्रत सुर्यास्त जवळ आला की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. लोकप्रबोधन दुरावत चालले. माणूस दुय्यम ठरत चाललाय. शिक्षण माणसाला माणूस बनवतो. ही संकल्पना मोडीत निघत आहे. अशा स्थितीत विधायक उपक्रम राबवून समाजाचे हित जोपासणारे व समाजावर संस्कार करणारे उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
कुलगुरू विद्यासागर पंडीत म्हणाले की, समाजाचे प्रबोधन सातत्याने सुरू ठेवण्याचे काम पत्रकारितेतून होते. अभिसरणातून समाज प्रगल्भ होतो. असे सांगून माणसाचे मोठेपण इतरांसाठी उपयोगी याव़े (प्रतिनिधी)