मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांची कोलांटी उडी; आता म्हणतायत, 'ओबीसीमधून...' 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 10:47 AM2023-09-04T10:47:00+5:302023-09-04T10:47:23+5:30

काँग्रेसचा उपोषणाला पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Vadettivar make u turn on Maratha Reservation; Now they say, 'no problem From OBC quota' | मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांची कोलांटी उडी; आता म्हणतायत, 'ओबीसीमधून...' 

मराठा आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांची कोलांटी उडी; आता म्हणतायत, 'ओबीसीमधून...' 

googlenewsNext

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नाही. पण 10 टक्के, 12 टक्के तेवढे पाडूनच दिले पाहिजे. तसेच ओबीसीमधून मराठा समाजाला जेवढे आरक्षण द्याल, तेवढी ओबीसींची टक्केवारी वाढवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

माझा आधी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध होता, पण आता मी माझी भूमिका बदलली आहे. माझा मराठा समाजाच्या उपोषणाला पाठिंबा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, पण ओबीसींची टक्केवारी वाढवा. कारण त्याच टक्केवारीतून आरक्षण दिले तर कुणाला काहीच मिळणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. 

काँग्रेसचा उपोषणाला पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहे. आरक्षणाची मागणी अधिवेशनात करणार आहे. राज्यकर्ते चर्चेसाठी हेर पाठवतात ते स्वतः आले असते तर प्रश्न सुटला असता. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. निर्णय कारायला अडचण काय आहे? नियत साफ असेल तर 15 दिवसांत आरक्षण मिळेल, असेही वडेट्टीवार म्हणाले. जिथे माझी गरज पडेल तिथे मी उभा राहीन, मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट माफ करावेत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. 

Web Title: Vijay Vadettivar make u turn on Maratha Reservation; Now they say, 'no problem From OBC quota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.