भाजपत जाण्याच्या अत्राम यांच्या दाव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "धर्मराव यांना भीती..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 09:22 AM2024-04-13T09:22:25+5:302024-04-13T09:23:13+5:30

वडेट्टीवार लवकरच भाजपामध्ये जाणार आहेत. ते अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत, असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला होता.

vijay Vadettivar s reaction on dharmarao baba Atram s claim to join BJP said he is afraid lok sabha election 2024 gadchiroli maharashtra | भाजपत जाण्याच्या अत्राम यांच्या दाव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "धर्मराव यांना भीती..."

भाजपत जाण्याच्या अत्राम यांच्या दाव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "धर्मराव यांना भीती..."

Dharmarao Baba Atram News:  राज ठाकरेंनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता आपली ताकद वाढल्याचा विश्वास महायुतीमधील अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे राज्यातील राजकारण वेग पकडत असतानाच आता विजय वडेट्टीवार लवकरच भाजपामध्ये जाणार आहेत. ते अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत, असा दावा धर्मराव बाबा आत्राम यांनी केला होता. दरम्यान, यावर आता खुद्द विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलीये.


"गडचिरोली चिमूर लोकसभा काँग्रेसमय झाला असून इंडिया आघाडीचं इकडे वर्चस्व दिसून येत आहे. या ठिकाणी त्यांना १०० टक्के भाजपचा पराभव दिसतोय. धर्मराव यांना भीती वाटतेय की जर जागा भाजपा हरली तर आपलं मंत्रिपदही उद्या धोक्यात येईल. या भीतीपोटी हे माझ्यावर भाजपमध्ये जाण्याचा आरोप करतायत," असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला.
 

"धर्मराव यांचं काय राहिलंय आता. त्यांच्या मतदार संघात त्यांनी कमळाला लीड घेऊन दाखवावी असं माझं आव्हान आहे. मी त्यांना आव्हान देतोय," असंही ते म्हणाले.
 

काय म्हणालेले धर्मराव बाबा अत्राम?
 

"विजय वडेट्टीवार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. ते अशोक चव्हाण यांचे राइट हँड आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या गटातील तसेच नजीकचे मानले जाणारे अनेक नेते भाजपामध्ये गेले आहेत. ही एक प्रकारची सूचक दिशा आहे की, विजय वडेट्टीवार हे भाजपामध्ये जाणार आणि ही गोष्ट १०० टक्के खरी आहे," असा मोठा दावा धर्मरावबाबा आत्राम यांनी केला होता.
 

"विजय वडेट्टीवार भाजपामध्ये जाण्यासंदर्भात ज्या काही बैठका, चर्चा झाल्या, त्यात मीही सहभागी होतो. त्यामुळे आज नाही तर उद्या विजय वडेट्टीवार भाजपामध्ये नक्की जाणार," असं आत्राम यांनी म्हटलं होतं.

Web Title: vijay Vadettivar s reaction on dharmarao baba Atram s claim to join BJP said he is afraid lok sabha election 2024 gadchiroli maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.