"सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करतंय", लाडकी बहीण योजनेवरही विजय वडेट्टीवारांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 12:43 PM2024-07-05T12:43:04+5:302024-07-05T12:46:27+5:30

Vijay Wadettiwar : शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवरूवन राज्य सरकारवर केली आहे.

Vijay Wadettiwar criticizes maharashtra government over Ladaki Bahin Yojana and farmers issue | "सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करतंय", लाडकी बहीण योजनेवरही विजय वडेट्टीवारांची टीका 

"सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करतंय", लाडकी बहीण योजनेवरही विजय वडेट्टीवारांची टीका 

मुंबई : शेतकऱ्यांचे ४६०० कोटी रुपये सरकारने दिलेले नाहीत. आपत्तीग्रस्तांच्या नावाला १५ हजार कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करत आहे, असा आरोप करत सरकारने लाडकी बहीण योजना जरी काढली असली, तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवरूवन राज्य सरकारवर केली आहे.

शुक्रवारी विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, मराठवाड्यातून शेतकऱ्यांच्या ३५० डीपी चोरीला गेल्या आहेत. त्यावर सरकारचचे लक्ष नाही. शेतकऱ्यांचे ४६००० कोटी रुपये सरकारने दिलेले नाहीत. आपत्तीग्रस्तांच्या नावाला १५ हजार कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करत आहे. तसेच, बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावाने लाटल्या. सरकार केवळ आम्ही खोटे नेरेटिव्ह सेट केले बोलतात. आम्ही काय खोटे नेरेटिव्ह सेट केले, तुम्हीच खोटं बोललात, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

याचबरोबर, लाडकी बहीण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी खात्यातून मत विकत घेणं आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही? निवडणुकीच्या तोंडावरच का सुचली? यातून काही निष्पन्न होणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच, दिक्षाभूमी येथील आंदोलनाबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, मी दिक्षाभूमीला गेलो होतो. गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. ही दडपशाही आहे. याबाबत पोलीस आयुक्तांशी बोलून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्या आणि सोडा अशी विनंती केली होती, मात्र आता गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही- विजय वडेट्टीवार
विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करेल का? असे विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमचे तीनही उमेदवार निवडून येतील ही खात्री आहे. तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

Web Title: Vijay Wadettiwar criticizes maharashtra government over Ladaki Bahin Yojana and farmers issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.