विजयानंद ट्रॅव्हल्सचा दोन पुरस्कारांनी सन्मान
By admin | Published: August 5, 2015 01:24 AM2015-08-05T01:24:59+5:302015-08-05T01:24:59+5:30
हुबळी येथील ‘व्हीआरएल लॉजिस्टिक लिमिटेड’चा विभाग असलेल्या ‘विजयानंद ट्रॅव्हल्स’ला बस वाहतुकीतील उत्कृष्ट सेवेबद्दल ‘एक्सलन्स इन बस ट्रान्स्पोर्ट
कोल्हापूर : हुबळी येथील ‘व्हीआरएल लॉजिस्टिक लिमिटेड’चा विभाग असलेल्या ‘विजयानंद ट्रॅव्हल्स’ला बस वाहतुकीतील उत्कृष्ट सेवेबद्दल ‘एक्सलन्स इन बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस-नॅशनल’ आणि ‘एक्सलन्स इन बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस-साऊथ’ अशा दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईत नुकताच पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा झाला.
‘अशोक लेलँड’ आणि ‘अभिबस डॉट कॉम’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित केला होता. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते विजयानंद ट्रॅव्हल्सचे उपाध्यक्ष प्रभू सालगिरी यांनी पुरस्कार स्वीकारले. यावेळी अशोक लेलँडचे व्यवस्थापकीय संचालक विनोद दासारी प्रमुख उपस्थित होते. सोहळ्यास देशातील सर्व प्रसिद्ध बससंस्थांचे मालक, प्रतिनिधी उपस्थित होते. या पुरस्कारांसाठी दोन महिन्यांपूर्वी देशातील विविध लग्झरियस बस उत्पादक कंपन्यांचे २५० अर्ज दाखल झाले होते. या स्पर्धकांना मागे टाकत विजयानंद ट्रॅव्हल्सने प्रतिष्ठेचे दोन पुरस्कार पटकाविले. गेल्या १६ वर्षांपासून विजयानंद ट्रॅव्हल्स सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर प्रवासी वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहे. दरम्यान, या पुरस्कारांबाबत ‘व्हीआरएल लॉजिस्टिक लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजय संकेश्वर, व्यवस्थापकीय संचालक आनंद संकेश्वर यांनी कंपनीच्या प्रवासी वाहतूक विभागाचे विशेष कौतुक केले आहे.
या पुरस्कारांचे श्रेय विजयानंद ट्रॅव्हल्सचे समाधानी प्रवासी, अनुभवी चालक व तज्ज्ञ कर्मचारी वर्ग यांना जाते. देशातील ४०० मार्गांवरील आमच्या प्रवाशांना भविष्यात सुरक्षित, किफायतशीर आणि जास्तीत जास्त आरामदायी सेवा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही या पुरस्कारांच्या निमित्ताने अध्यक्ष डॉ. विजय संकेश्वर आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद संकेश्वर यांनी दिली. (प्रतिनिधी)