विकास खारगे यांना पदाेन्नती, आता मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 06:37 IST2024-08-04T06:37:00+5:302024-08-04T06:37:21+5:30
ते १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. बीई (इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन्स) व एमए असे त्यांचे शिक्षण आहे.

विकास खारगे यांना पदाेन्नती, आता मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी विकास खारगे यांना अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. आता ते मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असतील.
ते १९९४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. बीई (इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन्स) व एमए असे त्यांचे शिक्षण आहे. नागपूर, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सीईओ, यवतमाळ व औरंगाबादचे जिल्हाधिकारी, सहआयुक्त विक्रीकर, भूजल सर्वेक्षणचे संचालक, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे आयुक्त, एसटी महामंडळ उपाध्यक्ष व एमडी अशा पदांवर त्यांनी काम पाहिले आहे.