शेतकऱ्यांना 25 हजार द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू: विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 12:04 PM2019-12-19T12:04:29+5:302019-12-19T12:10:23+5:30
विधानसभेत शेतकऱ्यांना 25 हजार देण्याचे मंजुर केलं नाही तर रस्त्यावर उतरुन मंजुर करुन घ्यावं लागेल, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
नागपूर: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तर अवकाळी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीची आठवण करून देत भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
आज महाराष्ट्रातील शेतक-यांचं लक्ष विधानसभेकडे आहे. पण मदत होत नाही. सरकराला रोज मदत करा ही आठवण करुन द्यावी लागते. तर विधानसभेत शेतकऱ्यांना 25 हजार देण्याचे मंजुर केलं नाही तर रस्त्यावर उतरुन मंजुर करुन घ्यावं लागेल, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
सामनाकडे लक्ष वेधून 25 हजारांचा प्रश्न सुटणार आहे का? बांधावर गेल्यावर काय म्हणाले होते हे पहा. कर्जमाफी नंतर देणार याबद्दल समजू शकतो, पण 25 हजार देणार हे मान्यच करा, असेही विखे पाटील यावेळी म्हणले.
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत तत्काळ जाहीर करण्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत आणि शिवसेनेच्या मुखपत्रातील बातमीचा फलकच विधानसभेत फडकवल्याने शिवसेना-भाजप आमदार भिडले असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनतर आज चौथ्या दिवशी सुद्धा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.