विक्रमगडात दिवाळी जल्लोषात

By admin | Published: November 2, 2016 02:59 AM2016-11-02T02:59:31+5:302016-11-02T02:59:31+5:30

शहरासह तालुक्याच्या परिसरात आणि त्यातील ग्रामीण भागात मोठया उत्साहाने दिवाळी साजरी झाली

Vikramgad in Diwali celebration | विक्रमगडात दिवाळी जल्लोषात

विक्रमगडात दिवाळी जल्लोषात

Next


विक्रमगड : या शहरासह तालुक्याच्या परिसरात आणि त्यातील ग्रामीण भागात मोठया उत्साहाने दिवाळी साजरी झाली असून अभ्यंगस्रानासह लक्ष्मीपुजन व पाडवा जल्लोषात साजरा करण्यांत आला यानिमीत्ताने येथील विविध विभाग परिसर व इमारतींवर विद्युतरोषणाई, आकाशकंदिलांचा झगमगाट केल्याने व सोबतीला बच्चेकंपनीचे आकर्षक किल्ले केल्याने व महिलांनी काढलेल्या रांगोळयाने दिवाळी उत्साहात झाली. हा परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून गेला आहे़घरांच्या,बिल्डींगच्या गॅलरीमध्ये सर्वत्र प्रकाशमय वातावरण निर्माण झाले आहेत़ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्रान झाल्यावर सकाळपासूनच तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यास्त्यांवर फटाक्यांची आतषबाजी केली. एकमेकांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या़
लक्ष्मीपूजन व पाडवाच्या दिवशी बाजारपेठेतील स्टोअर्समध्ये नविन हिशोबाच्या चोपडया, वार्षिक कॅलेंडर आणि लक्ष्मीदेवीच्या फोटोफ्रेम खरेदीकरण्यासाठी नागरिकांची सकाळीच मोठी गर्दी केली होती़ यावेळी व्यापारी वर्गाने आपल्या नविन व जुन्या हिशोबांच्या चोपडया, दुकानातील यंत्र याचे लक्ष्मीपूजनाच्या मुहर्तावर पूजन केले़
तर पाडव्याच्या दिवशी घराघरात गोडधोड नैवद्य करण्यात आला़ या दोन दिवसांत घरामध्ये फराळाचे केलेले पदार्थ आर्वजून खाण्याची प्रथा आहे़, तर सकाळी अंगणात सडा टाकून त्यावर आकर्षक रांगोळया काढुन एक कोपऱ्यांत त्यावर गुरांच्या शेणाचे
पाच पुंजके ठेवून त्यापुंजक्यावर झेंडुची फुले ठेवतात. नंतर हे पुंजके सुकल्यावर आपल्या शेतामध्ये टाकतात
त्यामुळे शेतात चांगले पिक येते अशी पूर्वापार प्रथा आहे़, ती जपली जाते. (वार्ताहर)
>छोट्यांनी साकारले एका पेक्षा एक किल्ले
विक्रमगड शहर तसेच ग्रामीण भागात दिवाळीचे औचित्य साधून लहानग्यांनी महाराष्ट्च्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. हे किल्ले तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवण्याची प्रथा आहे़
या किल्ल्यांना जिवंतपणा देण्यासाठी त्यावर छोटे मावळे, हत्ती, भालदार, चोपदार व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अशा विविध वस्तू ठेवल्या आहेत़ नोकरदावर्गालाही तीन ते चार दिवस सुटटी असल्याने आपल्या गावी जावून पांरपांरिक दिवाळी साजरी केली जात आहे़

Web Title: Vikramgad in Diwali celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.