विक्रमगड, तलासरी, मोखाड्यात पंचायतींचे बिगुल वाजले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 03:41 AM2016-10-19T03:41:53+5:302016-10-19T03:41:53+5:30

पालघर जिल्ह्यातील नवनिर्मित विक्रमगड, तलासरी व मोखाडा नगरपंचायत निवडणुकीचा मुहुर्त २७ नोव्हेंबर हा ठरला

Vikramgad, Talasi, Mokhada panchayats flutter! | विक्रमगड, तलासरी, मोखाड्यात पंचायतींचे बिगुल वाजले!

विक्रमगड, तलासरी, मोखाड्यात पंचायतींचे बिगुल वाजले!

Next


विक्रमगड/तलासरी/मोखाडा : पालघर जिल्ह्यातील नवनिर्मित विक्रमगड, तलासरी व मोखाडा नगरपंचायत निवडणुकीचा मुहुर्त २७ नोव्हेंबर हा ठरला असून विविध राजकीय पक्षांकडून सत्ता काबीज करण्यासाठी समिकरणाची जुळवाजुळव सुरु झाली आहे. विक्रमगडमध्ये १७ वार्ड असून त्यातील ११ अनुसूचित जमातींकरीता राखीव ठेवण्यात आले आहेत. तलासरीमध्ये १७ वार्डांपैकी १२ जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव असून ५ जागा या ओबीसींसाठी राखीव आहेत. तर मोखाड्यात १७ प्रभाग असून नगराध्यक्षपद अनुसुचित जातीतील महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे.
नवनिर्मित विक्रमगड नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी जाहीर झाली असून या निवणुकीसाठी आरक्षण काढण्यात आले आहे़ या नगरपंचायतीमध्ये एकूण १७ वार्ड असणार आहेत़ त्यामध्ये ११ वार्ड अनुसूचित जमातीकरीता राखीव ठेवण्यात आले आहेत़ त्यामध्ये ६ अ.ज. महिला व ५ अ.ज.पुरुषांसाठी राहाणार आहेत. तर मागास प्रवर्गाकरीता एकूण ५ वॉर्ड ठेवण्यात आले आहेत़ त्यामध्ये ३ महिलांसाठी तर २ पुरुषांसाठी राखीव राहाणार आहे़ व उर्वरीत एक वॉर्ड सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहाणार आहे़ असे एकूण १७ वार्डामध्ये ५० टक्के महिला आरक्षणानुसार ९ जागा महिलांसाठी असल्याने आगामी होणा-या नगरपंचायत निवडणुकीमध्ये महिलांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे़ व या नगरपंचातीमध्ये महिलाराज राहाणार असल्याचे दिसते़ त्यामुळे शिक्षित महिलांना व नविन चेहऱ्यांना उमेदवारीची संधी प्राप्त होणार असून त्या अनुषांगाने आत्तापासुनच पक्षांतर्गत राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे़
पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे़ दुस-या दिवशी दि़ २८ नोव्हेंबर रोजी त्या नगरपंचायतीची मतमोजणी करण्यांत येणार आहे़ नगरपंचायतींच्या क्षेत्रात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन आचारसंहिता लागू झाली आहे़ ती निकाल जाहीर झाल्यानंतर संपुष्टांत येणार आहे़ राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमापणपत्र व जात वैधता प्रमाणपत्ऱ सादर करणे आवश्यक आहे़ परंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या आर्जाची पोच पावती नामनिर्देशन पत्रासोबत सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे़ मात्र निवडून आल्यास अशा उमेदवाराला सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे़ अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे़ विक्रमगड नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांसाठी १० सष्टेंबर २०१६ रोजी अस्तित्वात येणारी विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी वापरली जाणार आहे़ त्यामुळे ज्यांची नावे त्या यादीत आहेत त्यांनाच मतदान करता येणार आहे. (वार्ताहर)

>निवडणुकीच्या कार्यक्रमाचे टप्पे
११ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करतील. दि़ २४ ते २९ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अर्ज स्वीकारणे सुरू, दि़ २९ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिवस, तर २ नोव्होंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्जांची छाननी, उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे़ दि़ ११ नोव्हें.रोजी अर्ज माघारीचा अंतिम दिवस़ याबाबत कुणाचेही अपील असल्यास त्याचा निर्णय लागेल. त्या दिवसापासून तिसऱ्या दिवशी निवडणूक चिन्ह देणे तसेच उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे.
दिनांक-२१ नोव्हेबर रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिध्द करण्याचा येणार आहे़ तर दि़ २१ रोजी जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रा निहाय मतदार यादी प्रसिध्द करायची आहे. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे़
दि़ २८ रोजी लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यांत येणार आहे. तसेच कलम १९ आणि ५१ अ- १ अ (९) मधील तरतूदीनुसार महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात निकाल प्रसिध्द करण्यांत येणार आहे़

Web Title: Vikramgad, Talasi, Mokhada panchayats flutter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.