कोकणात विक्रमी फळलागवड

By admin | Published: June 8, 2017 02:42 AM2017-06-08T02:42:52+5:302017-06-08T02:42:52+5:30

शासनाने २०१७ - १८ या वर्षासाठी तब्बल ३५ हजार हेक्टर जमिनीवर फळ लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे

Vikramme Kokan in Konkan | कोकणात विक्रमी फळलागवड

कोकणात विक्रमी फळलागवड

Next

नामदेव मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोकणामध्ये फळ लागवडीसाठी मोठी संधी आहे. यामुळे शासनाने २०१७ - १८ या वर्षासाठी तब्बल ३५ हजार हेक्टर जमिनीवर फळ लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पुढील तीन वर्षांमध्ये तब्बल ५२६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी, महसूल व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कोकण महसूल आयुक्तालय क्षेत्रामधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये फळ बागायतीसाठी प्रचंड संधी आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल ११ लाख हेक्टर पडीक जमीन आहे. या जमिनीचा योग्य वापर केल्यास तेथे विविध फळझाडांची लागवड करणे शक्य आहे. सद्यस्थितीमध्ये या परिसरामध्ये १ लाख १२ हजार हेक्टर जमिनीवर आंबा, १ लाख ४८ हजार हेक्टर जमिनीवर काजू, २७ हजार हेक्टर जमिनीवर नारळ, ४ हजार हेक्टर जमिनीवर चिकू व ४९ हजार हेक्टर जमिनीवर इतर फळांची लागवड करण्यात येत आहे. २०१५ - १६ या वर्षामध्ये या विभागात फक्त ५७३ हेक्टर जमिनीवर फळांची लागवड करण्यात आली होती. २०१६ - १७ मध्ये हे प्रमाण ६१०३ हेक्टर झाले आहे. भविष्यातील संधी लक्षात घेवून २०१७ - १८ या वर्षामध्ये ३५ हजार हेक्टर जमिनीवर फळ बागायत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी तीन वर्षांसाठीचा ५२६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व तयारी सुरू करण्यात आली आहे.
कृषी विभाग व ग्रामपंचायत विभागाकडून लागवडीचे नियोजन करण्यात येत असून कृषी विद्यापीठासोबतच सर्व यंत्रणांना एप्रिल २०१७ पासून प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे. लागवडीसाठी कृषी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही उद्दिष्ट निश्चित करून देण्यात येत आहे. या मोहिमेसाठी शेतकऱ्यांचीही निवड केली असून त्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे. फळबागेसाठी उपयुक्त असे जलकुंड तयार करण्यासाठी कृषी विद्यापीठाने दिलेले मॉडेलचा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. संपूर्ण देशाला फळांचा पुरवठा करण्याची क्षमता कोकणामध्ये आहे. या परिसरामध्ये असलेल्या जमिनीचा योग्य वापर व शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिल्यास फळ उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होवू शकते. पडीक जमीन लागवडीखाली आणण्याची गरज असून शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध केल्यास कोकणाचा कायापालट होण्याची शक्यता असल्याने कोकण महसूल विभागाच्यावतीने विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. फळलागवडीव्यतीरिक्त कोकणात मसाला पिकांनाही चांगली संधी आहे. परंतु मग्रारोहयो योजनेमध्ये मसाला पिकांचा समावेश नाही.
>रोहयोअंतर्गत
फळबाग लागवड
रोहयोव्यतिरिक्त लागवड
१.४० लाख हेक्टर
रोहयो योजनेत १९९० ते
२०१६- १७ पर्यंत लागवड
३.४८ लाख हेक्टर
एकूण फळबाग लागवड
४.८८ लाख हेक्टर
उत्पादनक्षम क्षेत्र
३.३९ लाख हेक्टर
मग्रारोहयोअंतर्गत फळबाग लागवडीचा तपशील
सन २०१५ - १६ मध्ये विभागात ५७३ हेक्टरवर लागवड
२०१६ - १७ मध्ये ६१०३ हेक्टरवर लागवड करण्यात आली. ही राज्यातील फळ लागवडीच्या ३७ टक्के होती.
२०१७ - १८ मध्ये ३५००० हेक्टर लागवडीची निश्चिती करण्यात आली
पुढील तीन वर्षांमध्ये ५२६ कोटींची गुंतवणूक अपेक्षित
>कोकण विभागाची जमीनधारणा
एकूण खातेदार
१३.२३
लाख हेक्टर
अल्प व अत्यल्प भूधारक
८४ टक्के
मोठे भूधारक
१६ टक्के

Web Title: Vikramme Kokan in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.