विलास शिंदें मृत्यू : आरोपी अल्पवयीन नव्हे 'सज्ञान'

By admin | Published: November 4, 2016 09:29 AM2016-11-04T09:29:21+5:302016-11-04T09:30:46+5:30

डयुटी बजावत असताना दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या विलास शिंदे यांच्या हत्येप्रकरणी अल्पवयीन आरोपीचा खटला सज्ञान म्हणून चालवण्यात येणार आहे

Vilas Shinde death: accused is not 'minor' | विलास शिंदें मृत्यू : आरोपी अल्पवयीन नव्हे 'सज्ञान'

विलास शिंदें मृत्यू : आरोपी अल्पवयीन नव्हे 'सज्ञान'

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - डयुटी बजावत असताना दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचे दोन महिन्यांपूर्वी दुर्दैवी निधन झाले. या घटनेला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीचा खटला 'सज्ञान' म्हणून चालवण्यात येणार आहे. ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाने हा खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. 
अल्पवयीन आरोपीवर 'सज्ञान' म्हमून खटला चालवण्याची मुंबईतील ही पहिलीच केस आहे. दिल्लीत डिसेंबर २०१२ झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणानंतर सरकारने अल्पवयीन आरोपींसंदर्भातील कायद्यात बदल केला. 
शिंदे यांच्या मृत्यूचे राज्यभरात मोठे पडसाद उमटले. त्यानंतर पोलिसांनी ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाकडे दाद मागितली असता आरोपीवर ' सज्ञान' म्हमून खटला चालवण्याची परवानगी दिली. “अल्पवयीन आरोपीला डोंगरी बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. आम्ही ज्युवेनाईल जस्टिस बोर्डाकडे दाद मागितली. बोर्डानेही विलास शिंदे यांच्या मृत्यूप्रकरणी अल्पवयीन आरोपीचा खटला सज्ञान म्हणून चालवण्यास परवानगी दिली आहे,” अशी माहिती खार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली.
(वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचे निधन, दुचाकीस्वाराने केली होती मारहाण)
(कॉन्स्टेबल विलास शिंदेंच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत देण्याची घोषणा) 
(आणखी एक पोलीस शहीद झाला एवढंच...)
(पोलिस शिपाई विलास शिंदेंच्या आईचा मृत्यू)
 
कसा झाला विलास शिंदेंचा मृत्यू?
२३ ऑगस्ट रोजी खार एसव्ही रोडवरील पेट्रोल पंपावर वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे डयुटी बजावत असताना त्यांनी एका १७ वर्षीय अहमद कुरेशी याला हेल्मेटविना गाडी चालवताना पकडले व लायसन्सची मागणी केली. मात्र त्या तरूणाकडे कोणतीही कागदपत्रं नसल्याने त्या दोघांदरम्यान वाद झाला. अहमदने फोन करून आपल्या भावाला बोलावले. शिंदे अहमदशी बोलत असतानाच त्याच्या भावाने शिंदेंच्या डोक्यात रॉडने हल्ला केला व तेथून पळ काढला. या हल्ल्यात जबर जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या शिंदे यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर त्यांची मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली व ३१ ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. या घटनेचे राज्यभरात मोठे पडसाद उमटले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले असता तेथील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला. 'पोलिसांना न्याय मिळालाच पाहिजे' अशा घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर देण्यात आल्या. त्यानंतर  विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसंच त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाला नोकरी देण्याचं आश्वासनही सरकारने दिलं. 
मात्र शिंदे कुटुंबियांचे दुर्दैव तेथेच संपले नाही. विलास शिंदे यांच्या मृत्यूमुळे खचलेल्या त्यांच्या आईचा शिंदे यांच्या तेराव्याचा विधी सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. 
 

Web Title: Vilas Shinde death: accused is not 'minor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.