मातोळा गाव पडले ओस
By Admin | Published: April 19, 2016 04:07 AM2016-04-19T04:07:28+5:302016-04-19T04:07:28+5:30
तालुक्याच्या एका कोपऱ्यावर असलेले मातोळा हे गाव.पाण्याअभावी शिवार उघडा-बोडका झाला आणि मजुरांनाच काय शेतकऱ्यांनाही काम उरले नाही़
रमेश शिंदे, औसा (जि. लातूर)
तालुक्याच्या एका कोपऱ्यावर असलेले मातोळा हे गाव.पाण्याअभावी शिवार उघडा-बोडका झाला आणि मजुरांनाच काय शेतकऱ्यांनाही काम उरले नाही़ अशा स्थितीत पोटापाण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत मातोळ्यातील सुमारे अडीच हजार लोकांनी दुसऱ्या गावचा रस्ता धरला.
तेरणा नदीवरील माकणीजवळ निम्न तेरणा प्रकल्पाच्या पायथ्याशी वसलेले मातोळा हे १० ते १२ हजार लोकसंख्येचे गाव़ नदीच्या काठावर असल्यामुळे जमिनीत जणू मोती पिकायचे. दोन-चार माळावरचे शेतकरी सोडले तर गावची शंभर टक्के शेती ओलिताखाली आली. त्यामुळे शेतीकामासाठी मजूर मिळेना, अशी एकेकाळी स्थिती होती. गावात ऊस वाहतूक करणाऱ्या किमान दोन गाड्या हंगाम संपेपर्यंत गावात राहायच्या. मात्र, मागील तीन ते चार वर्षांपासून या भागात पावसाचे प्रमाण कमी झाले़ परिणामी, तेरणाच्या तलावात पाणी आले नाही़ मातोळ्याची शेती उजाड झाली़ त्याचा फटका शेतकऱ्यांप्रमाणेच मजुरांनाही बसला़
आता अनेकांनी गाव सोडल्याने करीमनगर झोपडपट्टी आणि वडार वस्ती यामध्ये फक्त वृद्ध आई-वडीलच पाहायला मिळतात़ बहुतांश तरुणांनी पत्नी, मुला-बाळांसह पोटाची खळगी भरण्यासाठी पुणे-मुंबई गाठले़ शेतकऱ्यांनी चारा पाण्याअभावी आपल्या गुराढोरांना बाजारचा रस्ता दाखविला़ आता जे काही मोठे शेतकरी आहेत; तेच गावात आहेत़ त्यांची अवस्था ‘गाव सोडताही येईना आणि राहताही येईना’ अशी झाली आहे़ ‘पूर्वी गावात कामे भरपूर होती़ शेतात काम नाही. आमची मुले कामाच्या शोधात पुण्या-मुंबईला गेली आहेत,’ असे शशिकांत चव्हाण याने सांगितले़ धुळे / अमरावती : सततच्या नापिकीस कंटाळून धुळे आणि अमरावतीतील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी एक महिला शेतकरी आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पेरेजपूर येथील शेतकरी महिला रेखा भाऊसाहेब देवरे (४५) यांनी विष प्राशनाने मृत्यूला कवटाळले. त्यांचे पती भाऊसाहेब (४५) हे दिव्यांग असून त्यांना एक मुलगा (११), एक मुलगी (१९) आहे. त्यांना कर्जाचा भार असह्य झाला होता.
तसेच कोरडवाहू शेतीत कापूस न झाल्याने व नंतर पेरलेल्या कांद्यालाही विहिरीतील पाणी अपुरे पडल्याने हताश झालेल्या अमरावतीमधील चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील शेतकऱ्याने गुरुवारी विषारी औषध प्राशन केले होते. शेषराव मोतीराम पकळे (५५) असे त्याचे नाव असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा
मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
> च्औरंगाबाद : मद्यनिर्मिती उद्योगांचा पाणीपुरवठा बंद करून दुष्काळग्रस्तांना
ते पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयानजीक निदर्शने करण्यात आली. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी
झाले होते.
च् ‘वाह रे मोदी, तेरी मनमानी... सस्ती दारू, महंगा पानी’, ‘हा लढा कशासाठी, घोटभर पाण्यासाठी’, ‘भाजपा सरकार म्हणतंय काय.... पाणी दारूला देऊ, प्यायला नाय’, ‘राज्यात संपूर्ण दारुबंदी झालीच पाहिजे’ अशा घोषणांनी दुपारी रणरणत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. आ. सत्तार व पवार यांच्यावर टाकण्यात आलेल्या नव्या जबाबदारीनंतरचे हे पहिलेच आंदोलन होते.
>च्मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, अल्पभूधारक तसेच शेतमजूर कुटुंबातील ५५१ जोडण्यांचा सामूहिक विवाह सोहळा २४ एप्रिलला परतूर (जि. जालना) येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी प्रमुख पाहुणे असतील. लोणीकर हे या सोहळ्याचे आयोजक आहेत. नवदाम्पत्यास भेटवस्तूंबरोबरच त्यांच्या घरी शौचालय बांधून देण्यात येणार आहे.
> २०० फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदण्यास सांगणारे, बोअर यंत्रधारक आणि चालकांवरही ही कारवाई केली जाणार आहे. राज्यात सध्या ४,३५६ टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. त्यात कोकण विभागात ५२, नाशिक विभागात ८३१, पुणे विभागात ३०३, औरंगाबाद विभागात ३ हजार ३२, अमरावती विभागात १३१ तर नागपूर विभागात
७ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती लोणीकर यांनी दिली. लातूर शहराला शाश्वत पाणीपुरवठा व्हावा यासाठी अटल अमृत योजनेतून ७०० कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे, असे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
मुंबई - २०० फुटांपेक्षा खोल बोअरवेल खोदल्यास महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियमानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली.