वेळुकच्या तरुणांचा गणेशोत्सवातील 'गावची शाळा-गावाचा विकास' उपक्रम
By Admin | Published: September 13, 2016 07:53 PM2016-09-13T19:53:17+5:302016-09-13T19:53:17+5:30
ठाणे जिल्ह्यातील वेळुक या अतिदुर्गम खेड्यातील तरुणांनी यावर्षी अभिनव गणेशोत्सव साजरा केला.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुरबाड, दि. १३ - ठाणे जिल्ह्यातील वेळुक या अतिदुर्गम खेड्यातील तरुणांनी यावर्षी अभिनव गणेशोत्सव साजरा केला. गणेशोत्सवात रात्रीच्यावेळी जुगाराचे फड रंगतात. या असंस्कृतपणाला वेळुकच्या तरुणांनी मोडीत काढत या तरुणांनी एकत्र येऊन 'गावची शाळा आणि गावाचा विकास' हा कार्यक्रम हाती घेतला.
लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाच्या मूळ हेतूचा आज सर्वांना विसर पडला आहे. मात्र वेळूक गावतील तरुणांच्या या कृतीतून टिळकांचा शुद्ध हेतू पुन्हा सफल करण्याचा प्रयत्न दिसून येतो.
या तरुणांनी रात्रभर जागून गावच्या शाळेची सुधारणा, शाळा डिजिटल करणे,गावाचा विकास, गावातील आरोग्य उपकेंद्रात २४ तास कर्मचारी उपलब्ध करणे. जलयुक्त शिवार योजना राबवणे. अनियमित वीजपुरवठा, सांडपाणी,गटारे,रस्ते,पिण्याच्या पाण्याच्या समस्या या विषयांवर सविस्तर चर्चा केली, तर दुसऱ्या दिवशी थेट तालुक्याचे ठिकाण मुरबाड येथे संबंधीत अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना लेखी निवेदने दिली.
केवळ चर्चा आणि लेखी निवेदने यांवर न थांबता या तरुणांनी शाळा सुधार समिती स्थापन केली. बँक ऑफ महाराष्ट्र, शिरोशी शाखा येथे रीतसर खाते उघडून त्यांनी शाळा डिजिटल करण्यासाठी ५० हजाराचा निधी जमा केला.अनंत चतुर्दशीपासून गावातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा क्लासेस सुरु करण्यात येत आहेत कारण १० कि,मी. च्या परिसरात क्लासेस उपलब्ध नाहीत.तर पुढच्या १५ दिवसांत गावात वाचनालय सुरु करण्यात येत आहे, त्यासाठी पुस्तकांची खरेदी सुरु करण्यात आली आहे.
येत्या २६ जानेवारीपर्यंत शाळेच्या सर्व इमारतींची दुरुस्ती करून, कंपाउंड वॉल बांधणे. शाळेसाठी खेळाचे साहित्य ,इ-लर्निंग साहित्य खरेदी करून पुरवणे आणि शाळा हायटेक डिजिटल करणे हा निश्चय या तरुणांनी केला आहे.या तरुणांनी समाजातील दानशूर व्यक्ती,संस्था आणि लोकप्रतिनिधींना मदतीचे आवाहन केले आहे.