‘आपला गाव, आपला विकास’ अभियानात ग्रामस्थांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2016 01:43 AM2016-06-29T01:43:01+5:302016-06-29T01:43:01+5:30
पुणे जिल्हा परिषद व मावळ पंचायत समिती यांच्या वतीने ‘आपला गाव आपला विकास’ अभियानांतर्गत कार्यशाळा झाली.
कार्ला : पुणे जिल्हा परिषद व मावळ पंचायत समिती यांच्या वतीने ‘आपला गाव आपला विकास’ अभियानांतर्गत कार्यशाळा झाली. कार्यशाळा येथील महाराष्ट्र पर्यटन केंद्राच्या सभागृहात झाली.
कार्यशाळेत वरसोली गणातील कार्ला, वेहेरगाव, खांडशी, ताजे, टाकवे(खुर्द), सांगिसे, शिलाटणे, मुंढावरे येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, संसाधन गट, अंगणवाडीसेविका, आशासेविका आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अधिकारी सुजाता अंगडिया व विस्तार अधिकारी दीपाली पवार यांनी आपलं गाव आपला विकास म्हणजे काय, ही संकल्पना उपस्थितांना समजून सांगितली. ग्रामपंचायत निधी, चौदावा वित्त आयोग यातून मिळणाऱ्या निधीतून गावचा विकास करण्यासंदर्भात माहिती दिली. कार्ल्याच्या सरपंच अश्विनी हुलावळे यांनी स्वागत केले. ताजेचे सरपंच रामदास केदारी यांनी प्रास्ताविक केले. कार्ल्याचे ग्रामसेवक एम. डी. नाईकडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
कान्हेत एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिर
कान्हे : आमचा गाव, आमचा विकास अभियानांंतर्गत येथे पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या वतीने एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिरात ग्रामस्थ, सदस्य, सरपंच व गाव पातळीवरील सर्व सरकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात खडकाळा गणातील कान्हे, जांभूळ, साई ग्रामपंचातीने सदस्यांनी सहभाग घेतला.