खलनायकी भूमिका अधिक भावखाऊ!
By admin | Published: June 8, 2014 12:58 AM2014-06-08T00:58:56+5:302014-06-08T00:58:56+5:30
बालाजी फिल्म्सची निर्मिती ‘एक व्हिलन’ सिनेमातील मुख्य कलाकार सिद्धार्थ मल्होत्ना व नायिका श्रद्धा कपूर यांनी लोकमत कार्यालयास नुकतीच भेट दिली.
Next
>सिद्धार्थ मल्होत्र : ‘एक व्हिलन’ कलाकारांची लोकमत कार्यालयास भेट
बालाजी फिल्म्सची निर्मिती ‘एक व्हिलन’ सिनेमातील मुख्य कलाकार सिद्धार्थ मल्होत्ना व नायिका श्रद्धा कपूर यांनी लोकमत कार्यालयास नुकतीच भेट दिली. मोहित सुरीचं दिग्दर्शन लाभलेल्या या सिनेमाविषयी अधिक जाणून घेता तर आलंच, पण सिद्धार्थ आणि श्रद्धा यांचे अंतरंगही जाणून घेता आले.
टीपिकल हिंदी सिनेमातील नायकाचं वर्णन करता येईल, असा सिद्धार्थ आणि मधूनच मराठी बोलून आपलेपणा निर्माण करणारी श्रद्धा कपूर यांनी आपापली मनोगतं व्यक्त केली. सिद्धार्थने म्हणाला, एक व्हिलनमध्ये नेमके व्हिलन -(खलनायक) कोण, असा प्रश्न पडावा, अशी रहस्यमय, पण तरीही सतत उत्कंठावर्धक असे कथानक आहे. रितेश देशमुख, श्रद्धा आणि सिद्धार्थ हे त्रिकुट ग्रे शेडमध्ये असले, तरी खलनायकदेखील प्रेमात पडतात. त्यांची प्रेमकहाणी किती-कशी वेगळी असू शकते, माणसाच्या अंतरंगातील द्वंद्व कधी खलनायकी ठरू शकतं, असं सगळं या सिनेमात आहे. तर, शाहरूख खान माझा आदर्श असल्याचं त्यानं आवजरून सांगितलं़
‘हमारी इस फिल्म में कोई हिरो नही, सब व्हिलन है!’ सिद्धार्थला पुष्टी देत श्रद्धाने खळखळून हसत म्हटलं, प्रेमाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो, आम्ही मात्न येत्या 27 जून रोजी खलनायकांची कथा सांगण्यासाठी व्हिलनटाइन डे साजरा करू.
अभिनेता शक्ती कपूरची लेक आणि पद्मिनी कोल्हापुरेची भाची असलेली श्रद्धा कपूरला फेसबुकवर पाहून तिला पहिला ‘तीन पत्ती’ चित्नपट मिळाला; पण त्या सिनेमाला अपयश मिळालं आणि श्रद्धा लॅक्मेची ब्रँड अॅम्बॅसिडर बनली.
आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरेंकडे कधी तानपुरा घेऊन बसली. त्यानंतर तिला आशिकी -2 सिनेमा मिळाला आणि त्याच्या यशाने तिच्याकडे एक सफल अभिनेत्नी म्हणून पाहिले जाऊ लागले. मी माङया वडिलांकडून कधीही अपेक्षा व्यक्त केली नाही, कारण आपल्या मुलांना लाँच करणं एक वेळ सोपं असतं, पण यश टिकवणं कठीण! माङया वडिलांनी शून्यातून सुरु वात केली, खूप कठीण दिवस काढलेत. मला तर त्यांची लोकप्रियता, त्यांचे नाव आयतं लाभलंय! श्रद्धाला गोड गळ्याची देणगी मिळालीय. संधी मिळेल तेव्हा मी गाणं गाईन, असं श्रद्धा म्हणते. लोकमत कार्यालयात तिने गलिया हे तिनेच गायलेले लोकप्रिय ठरलेले गीत गाऊन दाखवले!
- पूजा सामंत
4माङया वडिलांनी शून्यातून विश्व निर्माण केले : श्रद्धा कपूर
संघर्षाची वाट मधुर
4बॉलिवूडमध्ये बहुतेक स्टार्स हे आपल्या फिल्मी नात्यांची वहिवाट घेऊन आलेले आहेत . मशहूर कपूर खानदानातील करीना-रणबीर या स्टार्सना संधी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला नाही, हे सर्वश्रुत आहे. पण, कुठलीही फिल्मी पाश्र्वभूमी नसताना सिद्धार्थला करण जोहरसारख्या नामांकित बॅनरमध्ये सुसंधी मिळाली कशी? सिद्धार्थ ऊर्फ सिड सांगतो, माङो इथे कसलेही लागेबांधे नाहीत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्ना माझा मामा लागतो, ही देखील अफवाच!
4बॉलिवूडमध्ये मोठय़ा संख्येने असलेले मल्होत्ना हे फक्त आडनाव बंधू ! मी पॉकेटमनी मिळतो, आवडते म्हणून मॉडेलिंग सुरू केले, पण मनसुबा मात्न अभिनयाचा होता. मुंबई गाठली. अभिनय आणि निर्मिती यांतील बारकावे शिकण्याची संधी घ्यावी म्हणून सहायक दिग्दर्शकाची संधी घेतली, तीही करण जोहरकडे मिळाली.
4दोन वर्षे मी तिथे काम केलं, त्यानंतर करणने स्टुडंट ऑंफ द इयरमध्ये मला आणि वरु ण धवनला संधी दिली! एकूणच मुंबईत मला संघर्ष चुकला नाही.