विनायक भोईरची मुंबई संघासाठी निवड

By admin | Published: March 3, 2017 05:32 AM2017-03-03T05:32:24+5:302017-03-03T05:32:24+5:30

पृथ्वी शॉ रणजी स्पर्धेत चमकत असतांनाच विरारच्याच आणखी एका खेळाडूची रणजी कसोटीसाठी निवड करण्यात आली आहे.

Vinayak Bhoir to be selected for Mumbai team | विनायक भोईरची मुंबई संघासाठी निवड

विनायक भोईरची मुंबई संघासाठी निवड

Next


वसई : विरारचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ रणजी स्पर्धेत चमकत असतांनाच विरारच्याच आणखी एका खेळाडूची रणजी कसोटीसाठी निवड करण्यात आली आहे. अर्नाळा येथील विनायक भोईर याची रणजी स्पर्धेच्या पुढील सत्रासाठी मुंबईच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. मुंबईसाठी निवडला गेलेला तो वसई तालुक्यातील पृथ्वीनंतरचा दुसरा खेळाडू ठरला असून विशेष म्हणजे दोघांचीही निवड एका महिन्याच्या अंतराने झाली आहे.
पृथ्वीची गेल्याच महिन्यात मुंबई रणजी संघात निवड झाली होती. त्याने पदार्पणातच शतक ठोकून मुंबईला अंतिम फेरीत नेण्यात निर्णायक खेळी केली होती. इतकेच नाही, तर नुकताच झालेल्या आयपीएलसाठी पृथ्वीला तब्बल चार कोटीची बोली लागली होती. वसईकरांसाठी ही अभिमानाची बाब असतानाच, आता अर्नाळा येथील विनायकची रणजीसाठी संभाव्य संघात निवड झाल्याने वसईत आनंदाचे वातावरण आहे. विनायकचे प्राथमिक शिक्षण अर्नाळा विद्यामंदिर शाळेत झाले. शालेय व स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपुर्ण कामगिरी करताना त्याने आपली छाप पाडली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Vinayak Bhoir to be selected for Mumbai team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.