विजय वडेट्टीवार जातीयवादी, मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी; विनायक मेटेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 17:23 IST2021-09-02T15:58:30+5:302021-09-02T17:23:51+5:30
Vinayak Mete slams vijay vadettiwar: 'मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे.'

विजय वडेट्टीवार जातीयवादी, मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी; विनायक मेटेंची मागणी
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा राजकारण एकदा राजकारण तापत आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. तसेच, काँग्रेस नेते व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, मागासवर्गीय आयोग जातीयवादी आयोग असून, तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केली.
https://t.co/Cw4QzE0g58 'आधी मोदींच्या नावाने मतं मागायची आणि जिंकून आल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायचं.'#UddhavThackeray#chandrakantpatil
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षाकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधता म्हटलं की, 'आज आम्ही धरणे आंदोलन करुन सरकारला फक्त इशारा देत आहोत. पण, मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत, तर 23 तारखेपासून अहमदनगरमधून आंदोलनाला सुरुवात करणार, असा इशारा त्यांनी दिला.
'सरकारमध्ये बसलेले काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?'
https://t.co/PLOjctavY8 'अनिल देशमुखांची संपत्ती उगाच जप्त होत नाहीये.'#AnilDeshmukh
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021
छत्रपतींच्या स्मारकासाठी वेळ दिला नाही
मेटे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. पण, स्मारकाचं काम अद्यापही सुरु झालेलं नाही. महाराजांच्या नावे राजकारण करणाऱ्यांना स्मारकाचा विसर पडलाय. छत्रपतींच्या स्मारकाबाबत सरकारने आम्हाला गेल्या 2 वर्षात 2 मिनिटंही वेळ दिला नाही, असं ते म्हणाले. तसेच, शिवस्मारकाचा विषय निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.