विनायक मेटे यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले !

By admin | Published: January 22, 2015 03:15 AM2015-01-22T03:15:52+5:302015-01-22T03:15:52+5:30

‘शिवसंग्राम’ संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून स्मारकाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Vinayak meteorist's dream disappeared! | विनायक मेटे यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले !

विनायक मेटे यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले !

Next

मुंबई : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याकरिता सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे ‘शिवसंग्राम’ संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून स्मारकाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मेटे यांचा मंत्रिपदाचा पत्ता कापला गेल्याची चर्चा आहे. येत्या २३ जानेवारी रोजी समितीची पहिली बैठक होणार आहे.
विधान परिषदेवर वर्णी लागल्यामुळे लाल दिव्याची गाडी मिळावी, अशी मेटे यांची अपेक्षा होती. परंतु आज त्यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते), पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अांतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईलगतच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. त्याकरिता जागा निश्चिती केलेली आहे. स्मारकाच्या उभारणीकरिता केंद्राच्या पर्यावरण, वन, जलवायू खात्यांकडून परवानग्या मिळवायच्या आहेत. त्या मिळवण्याची जबाबदारी ही समिती पार पाडणार आहे.

सरकारी आदेशात प्रिंट मिस्टेक
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या याबाबतच्या
आदेशात छत्रपतींच्या नावात प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे.

Web Title: Vinayak meteorist's dream disappeared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.