विनायक मेटेंच्या कार अपघाताला वेगळं वळण; ३ तारखेला २ वाहनांनी केला होता पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 12:23 PM2022-08-16T12:23:41+5:302022-08-16T12:24:10+5:30

विनायक मेटेंच्या अपघातावर अनेकजण संशय व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा घातपात आहे की अपघात याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत.

Vinayak Mete's car accident case takes a different turn; On 3 august there was a chase by 2 vehicles in pune | विनायक मेटेंच्या कार अपघाताला वेगळं वळण; ३ तारखेला २ वाहनांनी केला होता पाठलाग

विनायक मेटेंच्या कार अपघाताला वेगळं वळण; ३ तारखेला २ वाहनांनी केला होता पाठलाग

googlenewsNext

मुंबई - शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटेंच्या कार अपघाताला वेगळं वळण लागलं आहे. ३ तारखेला पुण्यात विनायक मेटेंच्या वाहनाचा पाठलाग केला होता. जवळपास २ किमी पाठलाग करण्यात आला होता असा दावा मेटेंचे कार्यकर्ते अण्णासाहेब वायकर यांनी केला आहे. त्यामुळे मेटेंच्या अपघाताची चौकशी करणाऱ्या पथकासमोर मोठं आव्हान निर्माण झाली आहे. 

अण्णासाहेब वायकर म्हणाले की, विनायक मेटेंच्या वाहनाचा ३ तारखेला पुण्यात आयशर ट्रकाने पाठलाग केला होता. त्यावेळी ते पिऊन गाडी चालवत असावेत असा अंदाज मेटेंनी व्यक्त केला. बीडहून पुण्यात आलो होतो. तेव्हा अर्टिंगा गाडी पाठलाग करत होती. आयशर ट्रक पुढच्या बाजूला होती. पुण्यापासून २० किमी अंतरावर ही घटना घडली आहे असा दावा त्यांनी केला आहे. 

मेटेंच्या पत्नीनेही व्यक्त केला संशय
आम्हाला कळविण्यात आलेल्या अपघाताची वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. एवढेच नाही, तर विनायक मेटे यांचा मृत्यू रुग्णालयात आणण्यापुरवीच झाला होता, असा दावाही त्यांनी सोमवारी केला. त्यांच्या मृत्यूचे कारण पीएम रिपोर्टमध्ये समोर येईलच असेही त्यांनी म्हटले आहे. 

मुंबई-पुणे द्रुतगती महामारगावरील भातण बोगद्याजवळ माजी आ. विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. यासंदर्भात बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना कामोठे रुग्णालयात पहाताच समजून आले, की समथिंग इज राँग. मेडिकल टरमिनॉलोजीनुसार, मृत्यूपश्चात माणूस पांढरा फटक पडत नाही. मेटे साहेंबाचा चेहरा आतोनात पांढरा पडलेला होता. त्यांच्या नाक व कानातून रक्त येत होते. त्यानंतर मी माझ्या भावाला सांगतिले ही घटना पाऊन तासापूर्वी घडलेली नाही. हा अपघात होऊन किमान दोन तास झाले असतील. काही तरी आमच्यापासून लपवले जात होते. कदाचीत लपवले जात नसेल, परंतु मला फोन येण्याआगोदर ती घटना घडून खूप वेळ झालेला होता. मृत्यूची वेळ पीएम रिपोर्टमध्ये येईलच असं त्यांनी सांगितले. 

अपघाताच्या चौकशीसाठी ८ पथके 
विनायक मेटेंच्या अपघातावर अनेकजण संशय व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा घातपात आहे की अपघात याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. त्यासाठी पोलिसांची ८ पथके नेमण्यात आली आहेत. मेटेंच्या कारचा चालक आणि ट्रक ड्रायव्हरची एकत्रित चौकशी करण्यात येणार असून त्यात आता कार्यकर्त्याने केलेल्या दाव्यामुळे अपघात प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. 

Web Title: Vinayak Mete's car accident case takes a different turn; On 3 august there was a chase by 2 vehicles in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.