विनायक निम्हण यांची ‘घरवापसी’

By Admin | Published: January 29, 2015 03:34 AM2015-01-29T03:34:47+5:302015-01-29T03:34:47+5:30

काँग्रेस नेते नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व माजी आमदार विनायक निम्हण तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत आले

Vinayak Nimhan's 'homecoming' | विनायक निम्हण यांची ‘घरवापसी’

विनायक निम्हण यांची ‘घरवापसी’

googlenewsNext

पुणे : काँग्रेस नेते नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक व माजी आमदार विनायक निम्हण तब्बल दहा वर्षानंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत आले. पक्षाने त्यांची तातडीने शहरप्रमुखपदी नियुक्तीही केली.
विधानसभा निवडणुकीच्या काळात निम्हण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, भाजपाच्या काही जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर निम्हण यांनी काँग्रेसकडून शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढविली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुणे शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठीही ते इच्छुक होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत २६ जानेवारीला झालेल्या स्नेह मेळाव्यातही त्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, बुधवारी त्यांनी मुंबईत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. १९९९ व २००४ असे दोन वेळा ते शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून आले होते. राणे यांचे खंदे समर्थक असल्याने त्यांनी त्यांच्यासोबतच २००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००९ मध्ये ते पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकले. त्यांना काँग्रेसमधून राज्यमंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने ते राणे यांच्यापासून दूर गेले. त्यानंतर ते पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. चव्हाण यांच्या आग्रहामुळेच त्यांनी निवडणूक लढविली. शहरप्रमुख म्हणून २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भगवा फडकविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया निम्हण यांनी दिली.

Web Title: Vinayak Nimhan's 'homecoming'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.