विनायक निमकर यांचे निधन
By admin | Published: October 8, 2016 03:17 AM2016-10-08T03:17:25+5:302016-10-08T03:17:25+5:30
विनायक निमकर (५९) यांचे ब्रेन हॅमरेजमुळे गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये निधन झाले.
डोंबिवली : रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीचे माजी विभाग कार्यवाह विनायक निमकर (५९) यांचे ब्रेन हॅमरेजमुळे गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये निधन झाले. संघाच्या सेवा विभागाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या सांभाळली होती.
बालपणपासून संघ स्वयंसेवक असलेले निमकर हे काही काळ ठाण्यात वास्तव्याला होते. त्यानंतर १९९४ पासून ते डोंबिवलीत वास्तव्याला आले. एका खासगी कंपनीत ते कार्यरत होते. कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी शेती व्यवसाय आणि संघ कामासाठी वेळ दिला. १५ दिवसांपूर्वी शेतात काम करत असताना त्यांना ब्रेन हॅमरेजमुळे त्रास झाला. रुग्णालयात उपचार घेताना त्यांचे निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, अंकूर आणि मयूर ही दोन मुले आहेत, अशी माहिती संघाचे कार्यकर्ते प्रदीप पराडकर यांनी दिली. अंत्यविधीला जिल्ह्यातील स्वयंसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.