“उद्धव ठाकरेंना शं‍कराचार्यांनी आशीर्वाद दिलेत, त्यांचे शब्द खरे ठरो हीच प्रार्थना”: राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:59 PM2024-07-16T12:59:52+5:302024-07-16T13:00:00+5:30

Thackeray Group Vinayak Raut News: तिसरी आघाडी करोत किंवा चौथी आघाडी करो, इंडिया आघाडी या वेळेला एकत्र लढेल आणि सरकार स्थापन करेल, असा दावा करण्यात आला आहे.

vinayak raut reaction over shankaracharya swami avimukteshwaranand saraswati statement about uddhav thackeray | “उद्धव ठाकरेंना शं‍कराचार्यांनी आशीर्वाद दिलेत, त्यांचे शब्द खरे ठरो हीच प्रार्थना”: राऊत

“उद्धव ठाकरेंना शं‍कराचार्यांनी आशीर्वाद दिलेत, त्यांचे शब्द खरे ठरो हीच प्रार्थना”: राऊत

Thackeray Group Vinayak Raut News: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानिमित्त देश-विदेशातील मान्यवारांची मांदियाळी एकाच ठिकाणी जमलेली पाहायला मिळाली. यावेळी देशभरातील महंत, शंकराचार्य यांसह धार्मिक क्षेत्रातील अनेक जण मुंबईत आले होते. यातच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा शं‍कराचार्यांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले आहे. 

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे स्वागत केले व आशीर्वाद घेतले. रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या पादुकांचे पूजनही केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी बोलताना महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. विश्वासघात करणारा कधीही हिंदू असू शकत नाही. तसेच, उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवायचे आहे, असे विधान शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी याबाबत सकारात्मक भाष्य केले आहे. 

उद्धव ठाकरेंना शं‍कराचार्यांनी आशीर्वाद दिलेत

उद्धव ठाकरे यांना शंकराचार्य यांनी आशीर्वाद दिले आहेत. त्यांचे शब्द खरे ठरु दे ही माझी प्रार्थना आहे, असे सांगताना विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेतून अशी विधाने करत आहेत. तसेच या वेळेला तिसरी आघाडी करू किंवा चौथी आघाडी करो, इंडिया आघाडी या वेळेला एकत्र लढेल आणि सरकार स्थापन करेल, असा दावा विनायक राऊतांनी केला. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे लाखोंच्या संख्येने मराठा समाज आहे. भाजपच्या टोळीने याचा संबंध महाविकास आघाडीशी जोडला आहे. ते करत असलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असे विनायक राऊत म्हणाले. 
 

Web Title: vinayak raut reaction over shankaracharya swami avimukteshwaranand saraswati statement about uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.