Vinayak Raut : "कावीळ झालेल्यांना सर्व पिवळं दिसतं तसंच..."; विनायक राऊतांचं प्रतापराव जाधवांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 04:15 PM2022-11-22T16:15:44+5:302022-11-22T16:35:56+5:30

Vinayak Raut Slams Prataprao Jadhav : बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे.

Vinayak Raut Slams Prataprao Jadhav Over 8 mlas and 3 mps will join shinde group statement | Vinayak Raut : "कावीळ झालेल्यांना सर्व पिवळं दिसतं तसंच..."; विनायक राऊतांचं प्रतापराव जाधवांना प्रत्युत्तर

Vinayak Raut : "कावीळ झालेल्यांना सर्व पिवळं दिसतं तसंच..."; विनायक राऊतांचं प्रतापराव जाधवांना प्रत्युत्तर

googlenewsNext

शिवसेनेत मोठं बंड झाल्यानंतर शिंदे गटाने 50 आमदारांसह सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे कमी संख्याबळ असताना शिंदे गटाचे प्रमुख आणि सध्याच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदही मिळाले. त्यानंतर, शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, काही दिवसांपूर्वीच शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिंदे गटाची ताकद आणखी वाढली असून आता खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठा दावा केला आहे. त्यानुसार, 8 आमदार आणि 3 खासदार शिंदे गटात येणार असल्याचं म्हटलं आहे.  

बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार 100 टक्के शिंदे गटात येतील असा दावा त्यांनी केला आहे. याला आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "ज्या पद्धतीने कावीळ झालेल्या व्यक्तींना सर्व पिवळं दिसतं त्याच पद्धतीने निष्ठेला विष्ठेची जोड देणाऱ्यांना आपण गद्दारी केली तशी इतरही करतील असं वाटतंय" असं म्हणत विनायक राऊतांनी जाधवांवर पलटवार केला आहे.

खासदार जाधव यांनी याआधी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले. मात्र, आता पुन्हा एकदा जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाचे घर खाली असेल असा दावा खासदार जाधव यांनी केला.

जाधव यांच्या या विधानामुळे आता ते 8 आमदार आणि 3 खासदार कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, ठाकरे गटातही या गौप्यस्फोटानंतर चाचपणी करण्यात येऊ शकते. दरम्यान, यापूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यादिवशीही 3 खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी, एकाही खासदाराने किंवा आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला नाही. त्यामुळे, प्रतापराव जाधव यांनी केलेला दावा कितपत खरा ठरणार हेही वेळ आल्यावरच दिसणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Vinayak Raut Slams Prataprao Jadhav Over 8 mlas and 3 mps will join shinde group statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.