विदर्भात ढगाळ वातारवण!
By admin | Published: November 25, 2015 01:56 AM2015-11-25T01:56:36+5:302015-11-25T01:56:36+5:30
तूर, हरभरा पिकाला बाधक; किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता.
अकोला : मध्यपूर्व अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात प्रदेशाच्या भागावर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने मागील चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे असले तरी विदर्भात वातावरण ढगाळ आहे. हे वातावरण तूर, हरभरा पिकांना बाधक ठरणारे असल्याने या पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे. वातावरणातील या बदलामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, तर कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान ता पमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे १६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, विदर्भावर असलेले ढगाळ वातावरण पिकांना बाधक ठरण्याची शक्यता आहे. यावर्षी पावसाअभावी खरीप पिकांना जबर फटका बसला असून, रब्बी पिकांचे क्षेत्र अर्धेच आहे; पण तूर या वातावरणातही तग धरू न आहे. तुरीच्या पिवळ्य़ा फुलांनी शिवार बहरले असून, अनेक ठिकाणी शेंगा आल्या आहेत. या पिकावरच आता शेतकर्यांचा भरवसा आहे; पण शेंगा भरण्याच्या वेळीच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अगोदरच या पिकावरील किडींचे व्यवस्थापन करताना शेतकरी हैराण आहे. त्यात ढगाळ वातावण रोग, किडींना पोषक असल्याने शेतकर्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. ढगाळ वातावरण असेच चार-पाच दिवस राहिल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढण्यात मदत होणार असल्याने शेतकर्यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढणार आहे. का पसावर येत असलेली हिरवी बोंडअळी हरभर्यावर येण्याची शक्यता असल्याने या पिकावरचा खर्च वाढणार आहे. ढगाळ वातावरण असेच चार-पाच दिवस राहिल्यास तूर व हरभरा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी दररोज शेताचं सर्वेक्षण करण्याची गरज असून, तुरीवर आलेली शेंगा पोखरणारी अळी व हरभर्यावरील किडींचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशींनुसार कीडनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी.बी. उंदीरवाडे यांनी दिला.