आचारसंहितेचे उल्लंघन, १३ गुन्हे दाखल

By admin | Published: February 22, 2017 02:24 PM2017-02-22T14:24:37+5:302017-02-22T14:24:37+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याचे १३ गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत.

Violation of Code of Conduct, 13 Cases Filed | आचारसंहितेचे उल्लंघन, १३ गुन्हे दाखल

आचारसंहितेचे उल्लंघन, १३ गुन्हे दाखल

Next

आचारसंहितेचे उल्लंघन, १३ गुन्हे दाखल
अमरावती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याचे १३ गुन्हे संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. आचारसंहिता पथकप्रमुखांच्या तक्रारीवरून हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पहिला गुन्हा १० फेब्रुवारीला तळेगाव दशासर ठाण्यात दाखल झाला. पथकप्रमुख पंकज भोयर यांनी ही तक्रार दाखल केली. अनिता मेश्राम यांच्या प्रचारार्थ महावितरणच्या पोलवर प्रचाराचे फलक लावण्याविषयीची ही तक्रार होती. १२ फेब्रुवारीला याच पथकप्रमुखांनी दत्तापूर ठाण्यात क्रांती मेश्राम यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यातक्रारीचे स्वरूप देखील असेच आहे. यादोन्ही प्रकरणात भादंविच्या कलम १८८ व सहकलम ३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. १४ फेब्रुवारीला धारणी ठाण्यात पथकप्रमुख एस.बी. ठोसर यांनी माया मालवीय यांचेविरोधात तक्रार दाखल केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार रॅलीत ११ चारचाकी वाहनांचा विनापरवानगी वापर केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी भादंविच्या कलम १८८ व सहकलम १३४, १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
१५फेब्रुवारीला भाजप पक्षाकरिता विनापरवानगी वाहनांचा वापर केल्याविषयी पत्रकप्रमुख एस.बी. ठोसर यांनी निशा गंगराळे यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी भादंविच्या कलम १८८ व सहकलम १३४, १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१७ फेब्रुवारीला वरूड ठाण्यात तहसीलदार जयंत गोरले यांनी द्रौपदी हरले, चंद्रकांत हरले व आ.अनिल बोंडे यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. सभेच्या परवानगीचे उल्लंघन केल्याप्रकरणी यासर्वांवर भादंविच्या कलम १८८ व सहकलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या प्रचाराकरिता विनापरवाना वाहनांचा वापर केल्याबाबत पथकप्रमुख एस.बी. ठोसर यांनी धारणी ठाण्यात १६ फेब्रुवारीला तक्रार नोंदविली. याप्रकरणी निशा गंगराळे यांचेविरोधात भादंविच्या कलम १८८ व सहकलम १३४, १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विनापरवानगी प्रचार सभा घेतल्याने शेख सरुराज शेख यांच्या विरोधात तहसीलदार जयंत गोरले यांनी १७ फेब्रुवारीला शेंदूरजनाघाट ठाण्यात तक्रार नोंदविली. प्रकरणी मुंबई पोलीस कायद्याच्या १३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
विनापरवानगी प्रचारसभा घेतल्याने पथकप्रमुख एस.बी.ठोसर यांनी भोकरबर्डीच्या वनिता पाल यांच्याविरूद्ध १७ फेब्रुवारीला धारणी ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी भादंवि १८८ व सहकलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. धारणी ठाण्यांतर्गत कुसूमकोट येथे सार्वजनिक पोलवर प्रचारफलक लावण्याबाबत राजकुमार पटेल व वंदना जावरकर विरोधात पथकप्रमुख एस.बी.ठोसर यांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम १८८ व सहकलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कुसूमकोट येथेच नीशा गंगराळे यांनी सार्वजनिक पोलवर फलक लावल्याने पथकप्रमुख ठोसर यांनी धारणी ठाण्यात तक्रार नोंदविली. भादंवि १८८ व सहकलम १३५, १३४ अन्वये गुन्हा दाखल केला. विना परवाना प्रचार वाहनाचा वापर केल्याप्रकरणी धारणी ठाण्यात पवार यांनी हरिसालचे सदाशिव खडसे विरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणी भादंवि १८८ व सहकलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
आजी-माजी आमदारांवरही गुन्हे दाखल
४आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आतापर्यंत १३ गुन्हे दाखल आहेत. यापैकी सर्वाधिक ८ गुन्हे धारणी ठाण्यात दाखल आहेत. तसेच आ.अनिल बोंडे यांच्यावर वरूड तालुक्यात व माजी आमदार राजकुमार पटेल यांच्यावर धारणी तालुक्यात आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Web Title: Violation of Code of Conduct, 13 Cases Filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.