विधानसभा उपाध्यक्षांच्या ओएसडीसह तिघांवर गुन्हा

By admin | Published: August 14, 2014 01:15 AM2014-08-14T01:15:43+5:302014-08-14T01:15:43+5:30

महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार वसंत पुरके यांच्या ओएसडीसह तीन जणांविरुद्ध बुधवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात बहुचर्चित जनरेटर खरेदी घोटाळ्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

Violence against deputy speaker of OSD | विधानसभा उपाध्यक्षांच्या ओएसडीसह तिघांवर गुन्हा

विधानसभा उपाध्यक्षांच्या ओएसडीसह तिघांवर गुन्हा

Next

जनरेटर खरेदी घोटाळा : पांढरकवडा येथे २९ लाखांची अफरातफर
पांढरकवडा : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार वसंत पुरके यांच्या ओएसडीसह तीन जणांविरुद्ध बुधवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात बहुचर्चित जनरेटर खरेदी घोटाळ्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
सारंग कोंडलकर असे या ओएसडीचे (आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी) नाव आहे. ते मुळात उपविभागीय महसूल अधिकारी आहेत. सध्या ते आमदार पुरके यांचे ओएसडी म्हणून कार्यरत आहेत. २०११ मध्ये ते आदिवासी विकास विभागात पांढरकवडा येथे प्रकल्प अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. कोंडलकर यांच्यासह अमरावतीचे तत्कालीन आदिवासी विकास अपर आयुक्त व्ही.जे. वरवंटकर, जे.एस. एन्टरप्राईजेस मुंबईचा मालक शब्बीर अली मौसीद अली या तिघांविरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी भादंवि ४२०, ४६५, ४६९, ४७१ तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १०, १२, १३ (१) (३) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अकोला येथील पोलीस उपअधीक्षक यु.के. जाधव यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. पांढरकवडा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्युतीकरणासाठी जनरेटरचा पुरवठा करण्याचे ठरले होते. त्यासाठी २० मार्च २०११ ते ३१ मार्च २०११ या काळात जनरेटरची खरेदी करण्यात आली.
त्याकरिता बनावट कागदपत्रेही तयार केली गेली. त्यात २९ लाख १६ हजार ४८० रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला. या प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. अमरावती अपर आयुक्त यांच्या स्तरावर सुमारे दोन कोटी रुपयांचा जनरेटर खरेदी घोटाळा झाला आहे. अमरावतीचे माजी आमदार जगदीश गुप्ता यांनी सर्वप्रथम यासंबंधी विभागीय महसूल आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती.
याच तक्रारीवर आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशीत घोटाळा निष्पन्न झाल्याने अकोला व पाठोपाठ पांढरकवडा येथे गुन्हे नोंदविले गेले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Violence against deputy speaker of OSD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.