पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 02:54 PM2018-08-09T14:54:01+5:302018-08-09T14:58:50+5:30

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे मोर्चाची सांगता झाल्यानंतर मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करत घोषणाबाजी सुरु केली.

The violent turn of the Maratha movement in Pune | पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण 

पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण 

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा जमाव झाला असून गदारोळ सुरु

पुणे : सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी(दि.९ आॅगस्ट) महाराष्ट्र बंदलापुणेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे हिंसक वळण लागले. सकाळपासून पुकारण्यात आलेल्या  बंदला शहरात दुकाने, बाजारपेठा,सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उत्स्फूर्तपणे बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ठिकठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी दुचाकीवरील रॅली, घोषणाबाजी  करण्यात आल्या. याचवेळी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे मोचार्ची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली. 
      मराठा समाजाने राज्यात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याला ठिकठिकाणी उदंड प्रतिसाद मिळत होता. याचदरम्यान पुण्यात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मोर्चाच्या प्रतिनिधींनी निवेदन दिल्यानंतर जमावाने कार्यालयात घुसत तोडफोेड सुरु करत घोषणाबाजी सुरु केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कार्यालयाच्या बाहेर जमा झाला असून तिथे प्रचंड गदारोळ सुरु आहे. याठिकाणी पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. तसेच जमावाला शांतता पाळण्याचे आवाहन देखील केले आहे. 
  पत्रकारांना उद्भवलेल्या प्रसंगाचे चित्रिकरण करण्यास आंदोलनकर्त्यांचा विरोध .या घटनेच्या दरम्यान आंदोलन कार्यकर्ते व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यात घटनेचे चित्रिकरण करण्यावरुन मतभेद झाले. व त्यांनी माध्यम प्रतिनिधींना चित्रिकरण करण्यास विरोध करताना कॅमेरे हिसकावले. 

 

Web Title: The violent turn of the Maratha movement in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.