सिंधुदूर्गात डंपरचालकांच्या आंदोलनाने घेतलं हिंसक वळण
By admin | Published: March 5, 2016 05:04 PM2016-03-05T17:04:06+5:302016-03-05T17:04:06+5:30
जिल्हाधिकारी सुरु असलेल्या डंपर मालक संघटनेच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड केली तसंच पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
सिंधुदूर्ग, दि. ५ - जिल्हाधिकारी सुरु असलेल्या डंपर मालक संघटनेच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड केली तसंच पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत जखमी झाले आहेत. काँग्रेस आमदार नितेश राणेंना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा डंपर मोटर मालक-चालक संघटनेच्यावीने शनिवारी सकाळपासून ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे. गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कठोर नियम लावले असल्याने या विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदोलन शुक्रवारपासून सुरू झाले आहे.